Kanda Anudan

या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान मिळणार | Kanda Anudan 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kanda Anudan: राज्यातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी असून, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसल्याने त्यांना तोटा सहन करावा लागत आहे. अनेक शेतकऱ्यांना कमी भाव मिळत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. 

राज्यात अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान (Kanda Anudan) देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि. 13/03/2023) रोजी विधानसभेत केली. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Kanda Anudan 2023

यासंदर्भात विधानसभेत निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर आहे. देशातील इतर राज्यातील कांद्याचे उत्पादन वाढल्याने पुरवठ्याच्या प्रमाणात मागणी कमी आहे. त्यामुळे कांद्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे. कांदा नाशवंत पीक असल्याने त्याला किमान आधारभूत किंमत लागू करता येत नाही. कांदा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक असून त्याला मिळणारा भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आणि जिव्हाळ्याचा भाग आहे.

अर्थसंकल्पातील शेतकर्‍यांसाठी ठळक घोषणा

सानुग्रह अनुदान म्हणून प्रति क्विंटल 300 रुपये

देशातील कांदा उत्पादन त्याची देशांतर्गत मागणी व देशातून होणारी निर्यात इत्यादी सर्व बाबींचा परिणाम बाजारपेठेतील कांद्याच्या दरावर होतो आणि झालेला आहे. उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने एक समिती नेमली होती. समितीने दोनशे आणि तीनशे रुपये प्रति क्विंटल शिफारस केली होती. परंतु सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहणारे असून त्यांना दिलासा देण्यासाठी सानुग्रह अनुदान म्हणून प्रति क्विंटल 300 रुपये देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्री काय म्हणाले येथे क्लिक करून पहा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top