Kanda Anudan 2023: सन 2022-23 या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान (Kanda Anudan 2023) देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. यासाठी दि. 3 एप्रिल 2023 ते 20 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
कांदा उत्पादक शेतकर्यांनी मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन पणन संचालक यांनी केले आहे. विहित नमुन्यातील अर्ज कुठे मिळणार? कागदपत्रे काय काय लागतील? यासंदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या ह्या लेखात पाहणार आहोत.
Kanda Anudan 2023
राज्यातील अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल 350 रुपये सानुग्रह अनुदान {Kanda Anudan 2023} देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली होती. यासंदर्भातील शासन निर्णय (Kanda Anudan GR) दिनांक 27 मार्च 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये, खाजगी बाजार मध्ये, थेट पणन अनुज्ञप्ती धारकांकडे अथवा नाफेडकडे दि. 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपये व जास्तीत जास्त 200 क्विंटलच्या मर्यादेत प्रती शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
कांदा अनुदान अर्ज या ठिकाणी मिळणार
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा अनुदान योजना सन 2022-23 (Kanda Anudan 2023) चा लाभ घेण्याकरिता विहीत नमुन्यातील अर्ज कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन परवाना धारक, नाफेड खरेदी विक्री केंद्र तसेच जिल्हा उपनिबंधक, तालुका उप/सहायक निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत.
अर्जाचा नमूना येथे क्लिक करून डाऊनलोड करून घ्या
अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे
- विक्री केलेल्या कांदा विक्रीची मुळपट्टी
- कांदा पिकाची नोंद असलेला 7/12 उतारा
- बँक पास बुकाची पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत
- आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत
- ज्या प्रकरणात 7/12 उतारा वडिलांच्या नावे व विक्री पट्टी मुलाच्या अथवा अन्य कुटुंबियांच्या नावे आहे अशा प्रकरणामध्ये सहमती असणारे शपथ पत्र. आवश्यक आहे.
सदर अर्ज ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कांदा विक्री केला त्या कृषि उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन अनुज्ञप्तीधारक, नाफेड खरेदी केंद्र प्रमुख यांचेकडे विहित वेळेत सादर करावेत, असे पणन संचालक यांनी कळविले आहे.
कांदा अनुदान योजनेच्या अटी व शर्ती जाणून घ्या
तर मित्रांनो, अशाप्रकारे कांदा उत्पादक शेतकर्यांना 350 रुपये कांदा अनुदान मिळणार आहे. लवकरात लवकर बाजार समितीमध्ये कांदा विकला आहे तिथे अर्ज सादर करावा.
🛑 अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीसाठी आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये नक्की जॉइन व्हा 👉 Whatsapp Group
___________________________________________________________________________