Kanda Anudan Arj: राज्यात अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल 350 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलेली आहे. अखेर यासंदर्भातील शासन निर्णय (Kanda Anudan GR) दिनांक 27 मार्च 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
कांदा अनुदान शासन निर्णय येथे क्लिक करून पहा
Kanda Anudan Arj
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये, खाजगी बाजार समित्यांमध्ये, थेट पणन अनुज्ञप्तीधारकाकडे अथवा नाफेडकडे दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते दिनांक 31 मार्च 2023 या कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना रुपये 350 प्रति क्विंटल व जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी काही अटी व शर्ती विहित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी महत्त्वाची अट खालीलप्रमाणे आहे.
- कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेखाली अनुदान मिळण्यासाठी कांदा विक्री पट्टी/विक्री पावती, 7/12 चा उतारा, आपले बँक बचत खाते क्रमांक इ. सह साध्या कागदावर ज्या बाजार समितीकडे कांद्याची विक्री केलेली आहे तेथे अर्ज करावा.
तर ह्या अटींनुसार एक अर्ज बाजार समितीकडे सादर करावा लागणार आहे. त्या अर्जाचा नमूना तुम्ही खाली पाहू शकता.
कांदा अर्जाचा नमूना
कांदा अनुदान मिळवण्यासाठी बाजार समितीकडे सादर करायचा अर्जाचा नमूना येथे क्लिक करून डाऊनलोड करून घ्या
🛑 अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीसाठी आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये नक्की जॉइन व्हा 👉 Whatsapp Group
📢 आता गॅस सिलेंडरवर मिळणार 200 रुपये सबसिडी | Gas Subsidy 2023
📢 तुमचा 12 अंकी रेशन कार्ड नंबर चेक करा तुमच्या मोबाईलवर | Ration Card Number Maharashtra