Kharip Hamibhav 2023: शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2023-24 साठी खरीप पिकांचे नवीन हमीभाव जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार हमीभावात वाढ करण्यात आल्याचे दिसून येत आहे. सोयाबीनच्या हमीभावात मागील वर्षीच्या तुलनेत 300 रुपये प्रतिक्विंटल, तूर 400 रुपये प्रतिक्विंटल आणि कापूस 540 रुपये प्रतिक्विंटल अशी वाढ करण्यात आली आहे.
तर मित्रांनो, खरीप हंगाम 2023-24 मध्ये कोणत्या पिकाला किती हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. हे आपण आजच्या ह्या लेखात जाणून घेणार आहोत..
👇👇👇
नमो शेतकरी सन्मान निधी योजना संपूर्ण माहिती येथे पहा
Kharip Hamibhav 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) विपणन हंगाम 2023-24 साठी सर्व अनिवार्य खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमतींमध्ये (एमएसपी) वाढ करायला मंजुरी दिली आहे.
उत्पादकांना त्यांच्या उत्पादनासाठी फायदेशीर भाव मिळावा हे सुनिश्चित करण्यासाठी आणि पीक विविधतेला प्रोत्साहन मिळावे, यासाठी खालील तक्त्यामध्ये दिल्याप्रमाणे सरकारने विपणन हंगाम 2023-24 साठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये वाढ केली आहे.
👉👉 येथे क्लिक करून खरीप 2023-24 सर्व पिकांचे हमीभाव PDF डाऊनलोड करा
खरीप 2023-24 हमीभाव
मागील वर्षीचे हमीभाव आणि या वर्षी जाहीर करण्यात आलेले नवीन हमीभाव खालील तक्त्यात नमूद केले आहे.
पिके | हमीभाव 2022-23 | हमीभाव 2023-24 | 2022-23 मधील हमीभावामध्ये मध्ये वाढ |
धान – सामान्य – | 2040 | 2183 | 143 |
धान -श्रेणी अ | 2060 | 2203 | 143 |
ज्वारी – संकरित | 2970 | 3180 | 210 |
ज्वारी – मालदांडी | 2990 | 3225 | 235 |
बाजरी | 2350 | 2500 | 150 |
नाचणी | 3578 | 3846 | 268 |
मका | 1962 | 2090 | 128 |
तूर / अरहर | 6600 | 7000 | 400 |
मूग | 7755 | 8558 | 803 |
उडीद | 6600 | 6950 | 350 |
भुईमूग | 5850 | 6377 | 527 |
सूर्यफूल बिया | 6400 | 6760 | 360 |
सोयाबीन (पिवळे) | 4300 | 4600 | 300 |
तीळ | 7830 | 8635 | 805 |
कारळे | 7287 | 7734 | 447 |
कापूस (मध्यम धागा ) | 6080 | 6620 | 540 |
कापूस (लांब धागा ) | 6380 | 7020 | 640 |
तर शेतकरी मित्रांनो, अशाप्रकारे खरीप हंगाम 2023-24 साठी पिकांचे हमीभाव जाहीर करण्यात आले आहे.
आशा करतो की आपणांस हा लेख उपयुक्त राहील. त्यामुळे हा लेख इतरांपर्यंत नक्की शेअर करा.
शासनाच्या सर्व योजनांचे सर्व अधिकृत अपडेट्स तुम्हाला आपल्या वेबसाईट वर मिळत राहतील, त्यासाठी आमच्या www.batamikamachi.com वेबसाईटला भेट देत रहा.
🛑 अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीसाठी आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये नक्की जॉइन व्हा 👉 Whatsapp Group