Kharip Pik Vima 2022: शेतकरी मित्रांनो, हंगाम संपत आला तरी पीक विमा धारक शेतकरी अजूनही खरीप हंगाम 2022 (Kharip Pik Vima 2022) च्या प्रतीक्षेत आहेत. तर पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्यांसाठी आज खरीप हंगाम 2022 च्या पीक विमा संदर्भातील अतिशय महत्त्वपूर्ण असे अपडेट आलेले आहे.
खरीप हंगाम 2022 करिता पीक विमा कंपन्यांना वितरीत करावयाचा राज्य शासनाचा हिस्सा म्हणून 244 कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आला आहे. याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या ह्या लेखात जाणून घेणार आहोत.
Kharip Pik Vima 2022
मित्रांनो, खरीप हंगाम 2022 {Kharip Pik Vima 2022} च्या पीक विम्यापोटी राज्य शासनाने राज्य हिस्सा अनुदान म्हणून याआधी पहिला हप्ता 840 कोटींचा वितरित केला होता. तर दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी 724 कोटींचा दुसरा हप्ता विमा कंपन्यांना वितरीत केला आहे. आता पीक विमा कंपन्यांना द्यावयाचे राज्य शासनाच्या हिस्स्याचे अनुदान म्हणून दिनांक 02 मार्च 2023 रोजी तिसरा हप्ता मंजूर केला आहे.
244 कोटी निधी वितरीत
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2022 व रब्बी हंगाम 2022-23 भारतीय कृषि विमा कंपनी, आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंशुरन्स कं. लि., बजाज अलियांझ जनरल इन्शुरन्स कंपनी, एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी व युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कंपनी या 5 विमा कंपनींमार्फत राबविण्यात येत आहे. भारतीय कृषि विमा कंपनी ही राज्यात विमा कंपन्यांची समन्वयक कंपनी आहे.
भारतीय कृषि विमा कंपनीने आयुक्त(कृषी) यांचे मार्फत प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2022 अंतर्गत उपरोक्त 5 कंपन्यांचा एकत्रित मिळून पिक विमा हप्त्यापोटी उर्वरीत राज्य हिस्सा अनुदान उपलब्ध करून देण्याची मागणी केलेली आहे. त्यास अनुसरुन दिनांक 13 जानेवारी 2023 च्या शासन निर्णयान्वये रु.724.52 कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. आयुक्त कार्यालयाने पत्रान्वये केलेल्या विनंतीस अनुसरून खरीप हंगाम 2022 करीता रु. 244,86,25,869/- इतकी रक्कम पिक विमा हप्त्यापोटी उर्वरीत राज्य हिस्सा अनुदान विमा कंपन्यांस अदा करण्यासाठी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. म्हणून दिनांक 02 मार्च 2023 रोजी शासन निर्णय घेण्यात आला आहे.
शासन निर्णय
भारतीय कृषि विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि तद्नुषंगाने कृषि आयुक्तालयाची शिफारस विचार करता प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2022 अंतर्गत भारतीय कृषि विमा कंपनी, आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंशुरन्स कं. लि., बजाज अलियांझ जनरल इन्शुरन्स कंपनी, एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी व युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कंपनी या 5 विमा कंपन्यांना पिक विमा हप्त्यापोटी उर्वरीत राज्य हिस्सा अनुदान रु.244,86,25,869/- (अक्षरी रक्कम रु. दोनशे चव्वेचाळीस कोटी शहाऐंशी लाख पंचवीस हजार आठशे एकोणसत्तर फक्त) इतकी रक्कम खालीलप्रमाणे वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कोणत्या कंपनीला किती निधी मिळणार आहे? हे तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता.
Kharip Pik Vima 2022
विमा कंपनी | एकूण देय राज्य हिस्सा विमा हप्ता रक्कम (रु) | विमा कंपन्यांना यापुर्वी वितरीत राज्य हिस्सा अनुदान (रु.) | वितरीत करण्यात येणारी राज्य हिस्सा रक्कम (रु.) |
भारतीय कृषि विमा कंपनी | ८९९३४३१३०८ | ७७९४४८९३१५ | ११७८६२४९४५ |
बजाज अलियान्झ जनरल इं.कं. लि. | २१९११२७९९३ | १५१६०८७७३६ | १०३०७०५०५ |
एचडीएफसी इर्गो जनरल इं.कं.लि | २११०५४४४३५ | १७१६३८४३४६ | ३३९४४१५२९ |
आयसीआयसीआय लोंबार्ड ज. इं. | २७००५७४४७१ | २२४०५५९३६८ | ४२४३७२३५५ |
युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कंपनी | २८१४२०४६३३ | २३९९४१०५८५ | ४०३११६५३५ |
एकूण खरीप हंगाम २०२२ | १८८०९८८२८४० | १५६६६९३१३५० | २४४८६२५८६९ |