Kharip Sudharit Paisewari:- शेतकरी मित्रांनो, संपूर्ण राज्यात या खरीप हंगामात अतिवृष्टीने तसेच सततच्या पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, त्याचा परिणाम उत्पादकतेवर दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाकडून आता सुधारीत पैसेवारी जाहीर होणे सुरू झाले आहे.
वाशिम जिल्ह्यात या आधी हंगामी पैसेवारी ही सरासरी ५४ पैसे जाहीर करण्यात आली होती, आता वाशिम जिल्ह्यात सुधारीत पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. शासकीय यंत्रणांनी काढलेल्या खरीप सुधारीत पैसेवारी ही आता ५० पैशांच्या आत आली आहे. सर्व तहसीलदारांकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार वाशिम जिल्ह्यातील एकूण ७९३ महसूल गावांची सरासरी पैसेवारी ४७ पैसे इतकी आली आहे.
Kharip Sudharit Paisewari
वाशीम जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाने मोठा धुमाकूळ घातलेला आहे. सरासरीच्या १०० टक्क्यांवर पाऊस झाला. अनेक मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. खरीप हंगामासाठी यंत्रणांनी केलेल्या अहवालानुसार पैसेवारीचा अहवाल तयार करण्यात आला आहे.
वाशिम जिल्ह्याची सुधारीत पैसेवारी खालील प्रमाणे
वाशीम तालुक्यात १३१ गावांमध्ये ४७ पैसे,
मालेगाव तालुक्यातील १२२ गावांत ४८ पैसे,
रिसोड तालुक्यातील १०० गावांची ४६ पैसे,
मंगरूळपीर तालुक्यातील १३७ गावांची ४७ पैसे,
कारंजा तालुक्यात १६७ गावांत ४७ पैसे
मानोरा तालुक्यात १३६ गावांत ४७ पैसेवारी आढळून आली.
जिल्ह्यातील ७९३ गावांतील प्रमुख पिकांची सुधारित पैसेवारी ४७ पैसे आलेली आहे. या सुधारित पैसेवारीच्या प्रस्तावास जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी मान्यता दिली आहे.
खरीप २०२० पीकविमा लाभार्थी यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ही माहिती उपयुक्त आणि माहितीपूर्ण अशी आहे त्यामुळे ही पोस्ट जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत नक्की शेअर करा. तसेच ताज्या बातम्या, विविध शासकीय योजना, शेतीविषयक माहिती आणि इतरही बरीच उपयुक्त माहितीसाठी आमच्या बातमी कामाची (www.batamikamachi.com) या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.