KKR vs RCB 2023

KKR vs RCB 2023 : कोलकाताचा आरसीबी वर दणदणीत विजय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

KKR vs RCB 2023: सुरू असलेल्या IPL 2023 मध्ये 6 एप्रिल 2023 रोजी, कोलकाताच्या इडन गार्डन्स स्टेडीयम वर कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (KKR vs RCB 2023) यांच्यात स्पर्धेचा 9वा सामना खेळला गेला. या सामन्यात केकेआरने एकतर्फी विजय मिळवत आरसीबीचा 81 धावांनी पराभव केला आहे.

अष्टपैलू शार्दुल ठाकूरने शानदार खेळ करत केकेआरच्या विजयात मोलाचा वाटा उचलला, त्याने बिकट परिस्थितीतून संघाला काढत प्रथम फलंदाजीत आक्रमक 68 धावा केल्या आणि नंतर गोलंदाजीत 2 षटकात 15 धावा देत 1 बळी घेतला. ठाकुरच्या या अष्टपैलू खेळाच्या बळावर त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

या लेखात तुम्ही काय वाचाल?

KKR vs RCB 2023

KKR vs RCB 2023 या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्याच्या गोलंदाजांनी 11व्या षटकात 65 धावांवर केकेआरच्या पाच फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवून योग्य दाखवला.

📃 आयपीएल 2023 चे वेळापत्रक 👉 PDF डाऊनलोड करा

मात्र अष्टपैलू शार्दुल ठाकूरच्या 29 चेंडूंत 9 चौकार आणि 3 षटकारांसह 68 धावांच्या तुफानी खेळीच्या जोरावर केकेआरने 20 षटकांत 7 गडी गमावून 204 धावांचा सन्मानजनक स्कोअर उभारला. तर दुसरीकडे, आरसीबीकडून गोलंदाजीमध्ये डेव्हिड विली आणि कर्ण शर्मा यांनी 2-2 तर मोहम्मद सिराज, हर्षल पटेल आणि मायकेल ब्रेसवेल यांना 1-1 विकेट मिळाली.

📽️ KKR vs RCB 2023 सामन्याचे Highlights 👉👉 येथे पहा

चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबी लक्ष्यापासून दूरच

केकेआरकडून 205 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबी 17.4 षटकात 123 धावांवर सर्वबाद झाला. आरसीबीकडून डु प्लेसिसने सर्वाधिक 23 धावांची खेळी खेळली. याशिवाय इतर कोणताही फलंदाज विशेष खेळी खेळू शकला नाही, विराट कोहली 21, ग्लेन मॅक्सवेल 5, शाहबाज अहमद 1, दिनेश कार्तिक 9 आणि अनुज रावत 1 धावा करून बाद झाले.

केकेआरकडून चमकदार गोलंदाजी झाली आणि वरुण चक्रवर्तीने त्याला मिस्ट्री स्पिनर का म्हटले जाते हे दाखवून दिले. चक्रवर्तीने 3.4 षटकात केवळ 15 धावा देत चार विकेट घेतल्या, तर सुयश शर्माने 3 विकेट, सुनील नारायणने 2 आणि शार्दुल ठाकूरने 1 बळी घेतला. यासह KKR ने IPL 2023 मध्ये आपला पहिला विजय मिळवला आहे.

📃 KKR vs RCB 2023 सामन्याचे संपूर्ण स्कोरकार्ड 👉👉 येथे पहा

KKR vs RCB 2023 Twitter Reactions

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top