Lek Ladki Yojana Maharashtra

Lek Ladki Yojana Maharashtra 2023 : लेक लाडकी योजना 2023 अर्ज सुरू, पहा पात्रता, कागदपत्रे, अटी व शर्ती, अर्ज कसा करावा?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Lek Ladki Yojana Maharashtra: मित्रांनो, मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने राज्यात गेल्या अर्थसंकल्पात “लेक लाडकी योजना” (Lek Ladki Yojana Maharashtra) सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

त्यासाठी दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली आणि या बैठकीत लेक लाडकी योजनेस (Lek Ladki Yojana Maharashtra) मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती.

अखेर दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी या योजनेचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्याचा संपूर्ण आढावा आपण आजच्या ह्या लेखात घेणार आहोत.

Lek Ladki Yojana Maharashtra 2023

मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे यासाठी दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) नविन योजना संदर्भाधीन दिनांक 1 ऑगस्ट, 2017 च्या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आली आहे.

👇👇👇

🧑‍🌾 नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता खात्यात जमा, पहा कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकर्‍यांना मिळाला पहिलं हप्ता?

सदर योजनेस मिळणारा अपुरा प्रतिसाद विचारात घेऊन, सदर योजना अधिक्रमित करुन मुलींच्या सक्षमीकरणाकरिता नवीन योजना लागू करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते.

त्यानुषंगाने सन 2023-24 च्या अर्थसंकल्पिय भाषणामध्ये “मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना सुरु करण्यात आली.

पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्यामध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख देण्यात येतील.” अशी घोषणा करण्यात आलेली आहे.

त्यास अनुसरून राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी “लेक लाडकी” ही योजना सुरू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यासाठी खालीलप्रमाणे शासन निर्णय घेण्यात आला आहे.

Lek Ladki Yojana Maharashtra GR

शासन निर्णय :-
माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) ही योजना अधिक्रमित करून राज्यात दिनांक १ एप्रिल, २०२३ पासून मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी “लेक लाडकी” योजना सुरू करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

👇👇👇

📃लेक लाडकी योजनेचा शासन निर्णय येथे पहा

लेक लाडकी योजना उद्दिष्टे

सदर योजनेची उद्दिष्टे खालीलप्रमाणे राहतील. :-

  • मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देवून मुलींचा जन्मदर वाढविणे.
  • मुलींच्या शिक्षणास चालना देणे.
  • मुलींचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे.
  • कुपोषण कमी करणे.
  • शाळाबाह्य मुलींचे प्रमाण 0 (शून्य) वर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे.

लेक लाडकी योजनेअंतर्गत खालील अटी शर्ती व त्याकरिता नमूद आवश्यक कागदपत्रे यांच्या आधारे पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर 5 हजार रुपये, इयत्ता पहिलीत 6 हजार रुपये, सहावीत 7  हजार रुपये, अकरावीत 8 हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये याप्रमाणे एकूण रुपये 1,01,000/- एवढी रक्कम देण्यात येईल.

लेक लाडकी योजनेच्या अटी व शर्ती

  • ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये दिनांक 1 एप्रिल, 2023 रोजी वा त्यानंतर जन्माला येणा-या एक अथवा दोन मुलींना लागू राहील. तसेच, एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील.
  • पहिल्या अपत्याच्या तिस-या हप्त्यासाठी व दुस-या अपत्याच्या दुस-या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता/पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
  • तसेच, दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. मात्र त्यानंतर माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
  • दिनांक 1 एप्रिल, 2023 पूर्वी एक मुलगी / मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना (स्वतंत्र) ही योजना अनुज्ञेय राहील. मात्र माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
  • लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक राहील.
  • लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. 1 लक्ष पेक्षा जास्त नसावे.

👇👇👇

👧 लेक लाडकी योजनेची संपूर्ण कार्यपद्धती येथे पहा

Lek Ladki Yojana Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे लागतील.

१) लाभार्थीचा जन्माचा दाखला
२) कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 1 लाखपेक्षा जास्त नसावे.) याबाबत तहसिलदार / सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील.
३) लाभार्थीचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथील राहील)
४) पालकाचे आधार कार्ड
५) बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
६) रेशनकार्ड (पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत)
७) मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभाकरिता 18 वर्ष पूर्ण झाल्यांनतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला)
८) संबधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला (Bonafied)
९) कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र (अटी शर्तीमधील क्रमांक 2 येथील अटीनुसार)
१०) अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील. (अविवाहीत असल्याबाबत लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र).

👇👇👇

👧 लेक लाडकी योजनेचा अर्ज येथून डाऊनलोड करा

तर मित्रांनो, अशाप्रकारे आजच्या ह्या लेखात आपण “लेक लाडकी योजना 2023” (Lek Ladki Yojana Maharashtra 2023) संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top