Maharashtra Voter List

नवीन मतदार यादी आली, आताच डाऊनलोड करून पहा तुमचे नाव | Maharashtra Voter List 2023 PDF Download

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Voter List 2023 PDF Download: मित्रांनो, आपल्या देशात प्रत्येक वर्षाला कोणती ना कोणती निवडणूक पार पडत असते. त्यामुळे मतदार याद्या देखील अद्यावत होत राहतात.

नुकतेच महाराष्ट्रात 7 हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या आहेत. आता पुढे राज्यात नगर परिषदांच्या निवडणुका देखील पार पडणार आहेत. आणि त्याकरिता नुकतेच नवीन मतदार नोंदणी सुद्धा करण्यात आली आहे.

भारत निवडणूक आयोगामार्फत दि. 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा (Maharashtra Voter List) विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. यानुसार राज्यात एकूण 9 कोटी 2 लाख 85 हजार 801 मतदारांची नोंदणी झाली आहे.

Maharashtra Voter List 2023 PDF Download

नवीन नोंदणी झालेल्या मतदारांची नावे आता नव्याने प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत आलेली आहेत. तर तुम्ही ही नवीन मतदार यादी तुमच्या मोबाईलवर देखील पाहू शकता. आणि त्यात तुमचे नाव आले की नाही हे चेक करू शकता. तर ही नवीन मतदार यादी कशी डाऊनलोड करावी? {Maharashtra Voter List 2023 PDF Download} हे आपण आजच्या ह्या लेखात पाहणार आहोत.

अशी डाऊनलोड करा नवीन मतदार यादी

मित्रांनो, नुकतीच नव्याने प्रसिद्ध झालेली नवीन मतदार यादी डाऊनलोड (Maharashtra Voter List 2023 PDF Download) करण्यासाठी खालीलप्रमाणे स्टेप्स फॉलो करावे लागेल.

  1. मित्रांनो नवीन मतदार यादी {Maharashtra Voter List} डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल. वेबसाईट पुढीलप्रमाणे आहे – https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/
  2. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिकृत वेबसाईट वर आल्यानंतर सर्वात वर मेनू टॅब मध्ये “Voter Services” या पर्यायावर क्लिक करावे. येथे क्लिक केल्यानंतर ड्रॉपडाउन मेनू ओपन होईल.
  3. ड्रॉपडाउन मेनूमध्ये तिसर्‍या क्रमांकावर PDF Electoral Roll (Partwise) हा पर्याय दिसेल. ह्या पर्यायावर क्लिक करावे.
  4. PDF Electoral Roll (Partwise) या पर्यायावर क्लिक केल्यावर Search Final Electoral Roll 2023 PDF (Part Wise) हे नवीन पेज ओपन होईल. जे खालीलप्रमाणे दिसेल.maharashtra voter list pdf download
  5. नवीन पेज ओपन झाल्यानंतर आता तुम्हाला ज्या जिल्ह्यातील मतदार यादी पाहायची आहे, तो जिल्हा निवडावा लागेल. जिल्हा निवडल्यानंतर संबंधित जिल्ह्यातील तुमचा विधानसभा मतदार संघ निवडावा.
  6. तुमचा विधानसभा मतदार संघ निवडल्यानंतर तुम्हाला ही मतदार यादी कोणत्या भाषेत पाहिजे आहे, ती भाषा निवडावी. येथे मराठी, इंग्लिश, उर्दू आणि कन्नड ह्या 4 भाषा निवडता येते.
  7. भाषा निवडल्यानंतर Select Part या ऑप्शन मधून तुम्हाला तुमचे गाव निवडून तुमच्या मतदार यादीचा भाग क्रमांक निवडावा लागेल.
  8. मतदार यादीचा भाग क्रमांक निवडल्यानंतर समोर दिलेला Captcha Code अचूकरीत्या टाकून घ्यावा.
  9. Captcha Code टाकून Open PDF या पर्यायावर क्लिक करावे.
  10. Open PDF या पर्यायावर क्लिक केल्यानंतर मतदार यादी तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड होऊन जाईल.
  11. ही यादी PDF स्वरुपात डाऊनलोड झाल्यानंतर तुम्ही यादी ओपन करून तुमचे नाव यादीत शोधू शकता.

तर मित्रांनो, अशाप्रकारे वरील स्टेप्स फॉलो करून अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही नवीन मतदार यादी (Maharashtra Voter List) डाऊनलोड करून पाहू शकता.

मतदार यादीत नाव नसेल तर काय करावे?

मित्रांनो, वरीलप्रमाणे मतदार यादी डाऊनलोड केल्यावर तुमचे नाव यादीत नसेल तर काय करावे? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या BLO (बूथ लेवल ऑफिसर) ला संपर्क करावा लागेल. प्रत्येक गावात मतदान केंद्रनिहाय BLO (बूथ लेवल ऑफिसर) नेमलेले असतात. साधारणत: तुमच्या गावातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक हे BLO (बूथ लेवल ऑफिसर) असतात.

मतदार यादीत तुमचे नाव आले नसल्याचे निदर्शनास आल्यास सर्वप्रथम BLO (बूथ लेवल ऑफिसर) यांच्याकडे चौकशी करावी. त्यांच्याकडे तुमच्या समस्येचे समाधान न झाल्यास तुम्ही तुमच्या तालुक्यातील तहसील कार्यालयात जाऊन निवडणूक विभागात चौकशी करू शकता. यासाठी एक नायब तहसिलदार नियुक्त करण्यात आलेले असतात.

तर मित्रांनो, अशाप्रकारे आज आपण नव्याने प्रसिद्ध झालेली मतदार यादी मोबाईल वर कशा पद्धतीने डाऊनलोड करून पहावी, हे सविस्तररित्या जाणून घेतले आहे. ही माहिती अत्यंत उपयुक्त अशी आहे त्यामुळे ही पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. आणि अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीसाठी आमच्या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.

📢  सलोखा योजना म्हणजे काय? सविस्तर माहितीसाठी 👉येथे क्लिक करा

📢  अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी डाऊनलोड करण्यासाठी 👉येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top