MSP Rabi Crops 2024-25 Declared: शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगाम 2024-25 करिता केंद्र शासनाने रब्बी पिकांचे हमीभाव (MSP Rabi Crops) आज दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर केले आहे.
त्यानुसार गव्हाचा हमीभाव 150 रुपयांनी तर हरभर्याचा हमीभाव 105 रुपयांनी वाढविण्यात आला आहे. तर मित्रांनो, रब्बी हंगाम 2024-25 साठी केंद्र शासनाने जाहीर केलेले हमीभाव आणि मागील वर्षी देण्यात आलेले हमीभाव किती होते? याची सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या ह्या लेखात जाणून घेणार आहोत.
👇👇👇
MSP Rabi Crops
मित्रांनो, रब्बी हंगाम आता काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे, त्याआधी केंद्र शासनाने रब्बी पिकांचे हमीभाव {MSP For Rabi Crops} जाहीर केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने विपणन हंगाम 2024-25 साठी सर्व अनिवार्य रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमतींमध्ये वाढ करायला मंजुरी दिली आहे.
उत्पादकांना त्यांच्या उत्पादनासाठी रास्त भाव मिळावा यासाठी सरकारने विपणन हंगाम 2024-25 साठी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतींमध्ये वाढ केली आहे.
गहू – हरभरा हमीभावात मोठी वाढ
मसूरच्या एमएसपीमध्ये 425 रुपये प्रति क्विंटल तर पांढरी मोहरी आणि काळ्या मोहरी साठी 200 रुपये प्रति क्विंटल दराने वाढ मंजूर करण्यात आली आहे.
गहू आणि करडईसाठी प्रत्येकी 150 रुपये प्रतिक्विंटल वाढ मंजूर करण्यात आली आहे.
बार्ली आणि हरभऱ्यासाठी अनुक्रमे 115 रुपये प्रति क्विंटल आणि 105 रुपये प्रति क्विंटल वाढ मंजूर करण्यात आली आहे.
अधिकृत माहिती येथे पहा 👉👉 रब्बी हंगाम 2024-25 हमीभाव
तर मित्रांनो, रब्बी हंगाम 2024-25 साठी केंद्र शासनाने जाहीर केलेले हमीभाव आणि मागील वर्षी देण्यात आलेले हमीभाव तसेच या वर्षी हमीभावात किती वाढ करण्यात आली आहे ते आपण पाहुयात.
MSP Rabi Crops 2024-25
पिकाचे नाव – गहू
मागील वर्षी मिळालेला हमीभाव – 2125 रु/क्विं.
यावर्षी मिळालेला हमीभाव – 2275 रु/क्विं.
हमीभावात वाढ – 150 रु.
पिकाचे नाव – बार्ली
मागील वर्षी मिळालेला हमीभाव – 1735 रु/क्विं.
यावर्षी मिळालेला हमीभाव – 1850 रु/क्विं.
हमीभावात वाढ – 115 रु.
पिकाचे नाव – हरभरा
मागील वर्षी मिळालेला हमीभाव – 5335 रु/क्विं.
यावर्षी मिळालेला हमीभाव – 5440 रु/क्विं.
हमीभावात वाढ – 105 रु.
पिकाचे नाव – मसूर
मागील वर्षी मिळालेला हमीभाव – 6000 रु/क्विं.
यावर्षी मिळालेला हमीभाव – 6425 रु/क्विं.
हमीभावात वाढ – 425 रु.
पिकाचे नाव – मोहरी
मागील वर्षी मिळालेला हमीभाव – 5450 रु/क्विं.
यावर्षी मिळालेला हमीभाव – 5650 रु/क्विं.
हमीभावात वाढ – 200 रु.
पिकाचे नाव – सूर्यफूल
मागील वर्षी मिळालेला हमीभाव – 5650 रु/क्विं.
यावर्षी मिळालेला हमीभाव – 5800 रु/क्विं.
हमीभावात वाढ – 150 रु.
तर शेतकरी मित्रांनो, अशाप्रकारे रब्बी हंगाम 2024-25 साठी केंद्र शासनाने जाहीर केलेले हमीभाव आणि मागील वर्षी देण्यात आलेले हमीभाव तसेच या वर्षी हमीभावात किती वाढ करण्यात आली आहे ते जाणून घेतले आहे.
विपणन हंगाम 2024-25 साठी अनिवार्य रब्बी पिकांसाठी एमएसपी मधील वाढ देशभरातील सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 पट इतकी निश्चित करण्याच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2018-19 च्या घोषणेनुसार आहे.
शेतकऱ्यांना त्यांच्या सरासरी उत्पादन खर्चावर अपेक्षित सर्वात जास्त 102% भाव गव्हासाठी मिळणार असून त्या खालोखाल पांढरी- काळी मोहरी या पिकांसाठी 98 %, मसुरला 89 %, हरभऱ्याला 60 %,बार्लीला 60% तर करडईला 52 % अधिक भाव मिळणार आहे.
रब्बी पिकांच्या या वाढलेल्या एमएसपीमुळे शेतकऱ्यांना रास्त भाव मिळतील आणि पीक विविधतेला प्रोत्साहन मिळेल.
_____________________________________________________________________
- अशाच प्रकारच्या शासकीय योजनांच्या माहितीसाठी आमच्या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा. 👉👉 batamikamachi.com
- विविध योजनांची माहिती आणि अपडेट्स तुमच्या व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी आमचे व्हाट्सअप चॅनल नक्की जॉइन करा. 👉👉 Whatsapp Group