Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana New GR

राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना पुन्हा सुरू, GR आला | Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana New GR

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2023: शेतकरी मित्रांनो, सोलर पंपाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची आणि दिलासादायक अशी बातमी आलेली आहे.

राज्यातील शेतकर्‍यांना महावितरणच्या माध्यमातून सौर कृषी पंपाचे वाटप करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना (Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana) पुन्हा एकदा नव्याने सुरू करण्यात येणार आहे.

यासंदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय दिनांक 09 जानेवारी 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. तर या शासन निर्णयाचा सविस्तर आढावा आणि कोणत्या शेतकर्‍यांना याचा लाभ मिळेल, याची सविस्तर माहिती आपण आजच्या ह्या लेखात जाणून घेणार आहोत.

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या लेखात तुम्ही काय वाचाल?

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana New GR

मित्रांनो, शेतकर्‍यांना दिवसा सिंचन शक्य व्हावे, राज्यातील कृषीपंप वीज जोडण्यांचे सौर उर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याच्या अभियानाअंतर्गत शासनाच्या सर्वसाधारण प्रवर्गाकरिता 90 टक्के आणि अनुसूचीत जाती आणि जमातीसाठी 95 टक्के अनुदानावर सौर कृषी पंप दिले जात आहे. यासाठी देशात आणि राज्यात केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडून शेतकर्‍यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान म्हणजेच कुसुम योजना (Kusum Solar Pump Yojana) राबविली जात आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेद्वारे 1 लाख सौर कृषी पंप बसविले जाणार

मित्रांनो, सदर कुसुम महाभियानाच्या पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्याबाबतच्या घटक ब (Componant B) अंतर्गत ऑगस्ट, 2022 अखेर केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला एकूण 2 लाख पारेषण विरहीत सौर पंप मंजूर करण्यात आले आहेत. सदर 2 लाख पारेषण विरहीत सौर कृषीपंपापैकी 1 लाख पारेषण विरहीत सौर कृषीपंपाची अंमलबजावणी महाऊर्जाद्वारे करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. म्हणजेच 1 लाख सौर कृषी पंप कुसुम योजनेद्वारे बसविण्यात आले आहे.

आता उर्वरित केंद्र शासनाने नव्याने मंजूर केलेल्या 1 लाख पारेषण विरहीत सौर कृषीपंपाची अंमलबजावणी स्टेट नोडल एजन्सी (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण) मार्फत महावितरण कंपनीकडून राज्यातील मागणी नोंदविलेल्या प्रलंबीत कृषि पंप विद्युत जोडण्यांच्या पुर्ततेसाठी म्हणेच ज्यांनी कोटेशन भरले आहे, त्यांच्यासाठी (Paid Pending) करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आणि आता 1 लाख सौर कृषी पंप हे Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana द्वारे बसविण्यात येणार आहे. म्हणून त्यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे. शासन निर्णय काय आहे पाहुयात.

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana

शासन निर्णय:-
प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थान महाभियान (कुसुम) अंतर्गत पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्याबाबतच्या घटक ब (Componant B) अंतर्गत ऑगस्ट, २०२२ अखेर महाराष्ट्राला मंजूर करण्यात आलेल्या एकूण २,००,००० पारेषण विरहीत सौर कृषीपंपापैकी केंद्र शासनाने नव्याने मंजूर केलेल्या १,००,००० पारेषण विरहीत सौर कृषीपंप स्टेट नोडल एजन्सी (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण) मार्फत महावितरण कंपनीकडून राज्यातील मागणी नोंदविलेल्या प्रलंबीत कृषि पंप विद्युत जोडण्यांच्या पुर्ततेसाठी (Paid Pending) आस्थापित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कुसुम घटक “ब” अंतर्गत जिल्हानिहाय सौर कृषि पंपांची संख्या निर्धारित करताना शहरी लोकसंख्या वगळता ग्रामिण लोकसंख्येच्या समप्रमाणात सौर कृषि पंपांची संख्या निर्धारित करावी. ही सर्व कार्यवाही करण्यासाठी महाऊर्जा योजनेच्या समन्वयासाठीची भूमिका पार पाडेल. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सौर कृषि पंपांची मागणी विचारात घेऊन जिल्ह्यातील सर्व तालुक्यात न्यायोचीत प्रमाणात पंप आस्थापित होतील याबाबतची खबरदारी घ्यावी. सदर योजनेतून पेड पेंडीग यादीमधील लाभार्थ्यांना पंप वितरीत करण्यात येणार असल्याने एखाद्या जिल्ह्यात सौर कृषि पंपांची मागणी कमी असल्यास सदर जिल्ह्यातील अधिकचे सौर पंप मागणी असणाऱ्या जिल्ह्यात सुकाणू समितीच्या मान्यतेने वळती करावेत.

सौर कृषीपंप आस्थापित झाल्यानंतर लाभार्थ्याला त्याची विक्री करता येणार नाही, अशी विक्री केल्याचे निदर्शनास आल्यास त्या लाभार्थ्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा व गुन्हा सिध्द झाल्यास सदर लाभार्थी राज्य शासन तसेच केंद्र शासनाच्या कोणत्याही योजनेच्या लाभासाठी पात्र राहणार नाही.

📢 घरकुल योजनेची नवीन लाभार्थी यादी जाहीर 👉 येथे क्लिक करून पहा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top