Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana 2023 : नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी हे शेतकरी ठरतील अपात्र

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Yojana: शेतकरी मित्रांनो, केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यातील शेतकर्‍यांसाठी आता महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी (Namo Shetkari Yojana) योजनेची घोषणा केलेली आहे.

राज्य शासनाच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेकरिता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असलेले राज्यातील शेतकरी पात्र ठरतील, अशी माहिती राज्य शासनाने दिलेली आहे. परंतू नमो शेतकरी महासन्मान निधी {Namo Shetkari Yojana 2023} योजनेकरिता कोणते शेतकरी अपात्र ठरतील, याची माहिती आपण आजच्या ह्या लेखात सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

नमो शेतकरी सन्मान निधी योजना संपूर्ण माहिती येथे पहा

Namo Shetkari Yojana

मित्रांनो, नुकत्याच सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात शेतकर्‍यांसाठी राज्य सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसारखीच नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केली. या योजनेस “नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” असे नाव देण्यात आले आहे. राज्यातील 1 कोटी 15 लाख कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

या योजनेमुळे आता महाराष्ट्रातील पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकर्‍यांना पीएम किसान योजनेचे वार्षिक 6 हजार रुपये आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे वार्षिक 6 हजार रुपये, असे एकत्रित वार्षिक 12 हजार रुपये मिळणार आहे. या योजनेसाठी राज्य शासनाकडून अर्थसंकल्पात 6900 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

23 जिल्ह्यांना 177 कोटी मदत मंजूर, पहा तुमच्या जिल्ह्याला किती मिळणार?

नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकर करा “हे” काम

मित्रांनो, राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असणे आवश्यक आहे.

त्यातही बँक खात्यास आधार कार्ड लिंक नसणे, पीएम किसान eKYC न करणे, Land Seeding मध्ये No दाखवणे इत्यादी त्रुटीमुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असलेल्या बर्‍याचशा शेतकर्‍यांचे काही हप्ते अजूनही मिळालेले नाहीत. तर अशा पीएम किसान योजनेत त्रुटी असलेल्या शेतकर्‍यांना लवकरात लवकर आपली त्रुटी दूर करावी लागणार आहे. तरच त्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेता येणार आहे.

नमो शेतकरी योजनेसाठी “हेच” शेतकरी पात्र

नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी हे शेतकरी ठरतील अपात्र

मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी (Namo Shetkari Yojana) कोणते शेतकरी पात्र ठरतील, हे तर राज्य शासनाने सांगितलेच आहे, ज्यामध्ये सामान्यत: या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत असेल, अशा सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ दिला जाईल, अशी माहिती राज्य शासनाकडून देण्यात आलेली आहे.

तर आता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी कोणते शेतकरी अपात्र ठरतील? हे पण पीएम किसान सन्मान निधी योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांवरून निश्चित केले जाण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे खालील शेतकरी अपात्र ठरू शकतात.

खालील उच्च आर्थिक श्रेणीतील व्यक्ती या योजनेच्या लाभासाठी पात्र असणार नाहीत.

  1. सर्व संस्थात्मक जमीनधारक
  2. खालीलपैकी एक किंवा अधिक श्रेणीशी संबंधीत शेतकरी कुटूंब
  • संवैधानिक पद धारण करणारे/ केलेले आजी व माजी व्यक्ती.
  • आजी/माजी मंत्री/राज्यमंत्री, आजी/ माजी खासदार/राज्यसभा सदस्य, आजी/माजी विधानसभा/विधान परीषद सदस्य, आजी/माजी महानगरपालीकेचे महापौर, आजी/माजी जिल्हा परीषदेचे अध्यक्ष.
  • केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी/ कर्मचारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारीतील कार्यालयांमधील आणि स्वायत्त संस्थांचे सर्व अधिकारी/कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नियमीत अधिकारी/कर्मचारी. चतुर्थश्रेणी / गट ड वर्ग कर्मचारी वगळून
  • सर्व निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रू. १०,०००/- किंवा त्यापेक्षा जास्त आहे. चतुर्थश्रेणी / गट ड वर्ग कर्मचारी वगळून
  • मागील वर्षात आयकर भरलेल्या सर्व व्यक्ती.
  • नोंदणीकृत व्यवसायिक डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल (C.A), वास्तुशास्त्रज्ञ, इ. क्षेत्रातील व्यक्ती.

तर मित्रांनो, वरीलप्रमाणे पीएम किसान सन्मान निधी योजनेतील अपात्र लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी अपात्र ठरू शकतात.

तर मित्रांनो, अशाप्रकारे राज्य शासनाची नवीन योजना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत कोणते शेतकरी अपात्र ठरू शकतात, याची सविस्तर माहिती आपण आज ह्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेतली आहे. या योजनेचे सर्व अधिकृत अपडेट्स तुम्हाला आपल्या वेबसाईट वर मिळत राहतील, त्यासाठी आमच्या www.batamikamachi.com वेबसाईटला भेट देत रहा.  

🛑 अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीसाठी आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये नक्की जॉइन व्हा 👉 Whatsapp Group

__________________________________________________

📢 नमो शेतकरी सन्मान निधी योजना | Namo Shetkari Sanman Nidhi Yojana 2023

📢 फक्त याच शेतकर्‍यांना मिळणार 350 रुपये अनुदान, GR आला | Kanda Anudan GR

📢 तुमचा 12 अंकी रेशन कार्ड नंबर चेक करा तुमच्या मोबाईलवर | Ration Card Number Maharashtra

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top