Namo Shetkari Yojana 1st Installment Released

Namo Shetkari Yojana 1st Installment Released : नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता खात्यात जमा, पहा कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकर्‍यांना मिळाला पहिलं हप्ता?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Yojana 1st Installment Released: शेतकरी मित्रांनो, राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना बर्‍याच दिवसापासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याची प्रतीक्षा होती. अखेर ही प्रतीक्षा संपली आहे.

दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजी देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता (Namo Shetkari Yojana 1st Installment Released) लाभार्थी शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.

या लेखात तुम्ही काय वाचाल?

Namo Shetkari Yojana 1st Installment Released

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न प्राप्त व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये थेट जमा करण्यात येतात.

त्याच धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘नमो शेतकरी सन्मान निधी (Namo Shetkari Yojana)’ योजनेचा शुभारंभ दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी (जि. अहमदनगर) येथे करण्यात आला आहे.

राज्य सरकारच्या या योजनेमुळे केंद्र आणि राज्याचे मिळून शेतकऱ्यांना आता दरवर्षी 12 हजार रुपये सन्मान निधी म्हणून मिळतील. तर राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकर्‍यांना मिळाला आहे, याचा जिल्हानिहाय तपशील आपण आजच्या ह्या लेखात जाणून घेणार आहोत.

👇👇👇

नमो शेतकरी योजनेचे स्टेट्स चेक करा तुमच्या मोबाईल वरच

85 लाख 60 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 1712.02 कोटी जमा

प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी एका क्लिकद्वारे राज्यातील 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 1712.02 कोटी रुपये पाठवून योजनेचा शुभारंभ केला.

दरम्यान, हा आपल्या जीवनातील ऐतिहासिक व अविस्मरणीय दिवस असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत नमूद केले आहे.

 

उपमुख्यमंत्री तथा तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2023 24 चा अर्थसंकल्पीय भाषणांमध्ये या योजनेचा शुभारंभ करण्याचे घोषणा केली होती. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या योजनेला गती दिली.

किरकोळ तांत्रिक कारणांमुळे राज्यातील 12 लाख शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेपासून वंचित होते. या शेतकऱ्यांसाठी त्यांनी राज्यभरात विशेष मोहिम घेतली आणि 6 लाख शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत वाढविले.

या शेतकऱ्यांना आता नमो किसान सन्मान योजनेचा सुद्धा लाभ मिळणार आहे. Namo Shetkari Yojana 1st Installment Released

Namo Shetkari Yojana जिल्हानिहाय तपशील

नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळालेले सर्वाधिक शेतकरी अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. नगर जिल्ह्यातील 5 लाख 17 हजार 611 शेतकऱ्यांना 103 कोटी रुपये वितरित करण्यात आले.

त्या खालोखाल सोलापूर जिल्ह्यातील 4 लाख 54 हजार 40 शेतकऱ्यांना 90 कोटी 81 लाख, कोल्हापूर जिल्ह्यातील 4 लाख 6 हजार 240 शेतकऱ्यांना 81 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

या योजनेतून जिल्हा निहाय वितरित करण्यात आलेली रक्कम आणि लाभार्थी संख्या खालील प्रमाणे-

अहमदनगर- 5,17,611 शेतकऱ्यांना 103.52 कोटी

अकोला – 1,87,816 शेतकऱ्यांना 37.56 कोटी

अमरावती – 2,65,916 शेतकऱ्यांना 53.18 कोटी

संभाजीनगर – 3,26,840 शेतकऱ्यांना 65.37 कोटी

बीड – 3,89,527 शेतकऱ्यांना 77.91 कोटी

भंडारा – 186031 शेतकऱ्यांना 37.21 कोटी

बुलढाणा – 331894 शेतकऱ्यांना 66.38 कोटी

चंद्रपूर – 216613 शेतकऱ्यांना 43.32 कोटी

धुळे – 142441 शेतकऱ्यांना 28.40 कोटी

गडचिरोली – 129639 शेतकऱ्यांना 25.93 कोटी

गोंदिया – 212418 शेतकऱ्यांना 42.48 कोटी

हिंगोली – 180576 शेतकऱ्यांना 36.12 कोटी

जळगाव – 379549 शेतकऱ्यांना 75.91 कोटी

जालना – 289771 शेतकऱ्यांना 57.95 कोटी

कोल्हापूर – 406240 शेतकऱ्यांना 81.25 कोटी

लातूर – 267300 शेतकऱ्यांना 53.46 कोटी

नागपूर – 150414 शेतकऱ्यांना 30.08 कोटी

नांदेड – 377415 शेतकऱ्यांना 75.48 कोटी

नंदुरबार – 96585 शेतकऱ्यांना 29.32 कोटी

नाशिक – 385347 शेतकऱ्यांना 77.07 कोटी

धाराशिव – 211409 शेतकऱ्यांना 42.28 कोटी

पालघर – 80336 शेतकऱ्यांना 16.07 कोटी

परभणी – 267107 शेतकऱ्यांना 53.42 कोटी

पुणे – 389842 शेतकऱ्यांना 77.97 कोटी

रायगड – 98264 शेतकऱ्यांना 19.65 कोटी

रत्नागिरी – 127600 शेतकऱ्यांना 25.52 कोटी

सांगली – 367179 शेतकऱ्यांना 73.44 कोटी

सातारा – 393334 शेतकऱ्यांना 78.67 कोटी

सिंधुदुर्ग – 108103 शेतकऱ्यांना 21.62 कोटी

सोलापूर – 454040 शेतकऱ्यांना 90.81 कोटी

ठाणे – 68367 शेतकऱ्यांना 13.67 कोटी

वर्धा – 123376 शेतकऱ्यांना 24.68 कोटी

वाशीम – 154052 शेतकऱ्यांना 30.81कोटी

यवतमाळ – 277130 शेतकऱ्यांना 55.43कोटी

__________________________________________________________________________

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top