Namo Shetkari Yojana 2nd Installment: केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने राज्यातील शेतकर्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या दुसर्या हप्त्यासंदर्भात (Namo Shetkari Yojana 2nd Installment) अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट आलेले आहे.
नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता ऑक्टोबर 2023 मध्ये वितरीत करण्यात आल्या नंतर राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना या योजनेच्या दुसर्या हप्त्याची (Namo Shetkari Yojana 2nd Installment) प्रतीक्षा होती. अखेर ही प्रतीक्षा संपणार आहे, कारण राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेच्या दुसर्या हप्त्यासाठी 1792 कोटी रुपये मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे.
Namo Shetkari Yojana 2nd Installment
सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ही योजना घोषित करण्यात आली होती.
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देण्यात येणार्या प्रति वर्ष, प्रति शेतकरी रु.6000 या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी रु.6000 इतक्या निधीची भर घालणारी “नमो शेतकरी महासन्मान निधी” ही योजना राबविण्यास दिनांक 15 जुन 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.
👉 असे चेक करा नमो शेतकरी योजनेचे स्टेट्स
प्रस्तुत योजने अंतर्गत पहिला हप्ता (माहे एप्रिल ते जुलै) लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रु.1720 कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. आता संचालक (वि.प्र.), कृषि आयुक्तालय, पुणे यांनी केलेल्या विनंतीस अनुसरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत दुसरा हप्ता (माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर) लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रु.1792 कोटी इतका निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यासाठी दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
📑 सविस्तर शासन निर्णय येथे पहा
फक्त “याच” शेतकर्यांना मिळेल नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी वितरीत करण्यात येणार आहे. तर राज्याचे कृषि आयुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकर्यांना पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता मिळेल, त्याच शेतकर्यांना नामो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता हा दिला जाणार आहे.
👨🌾 नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता फक्त “याच” शेतकर्यांना मिळणार