Nuksan Bharpai 2022 Maharashtra: गेल्या खरीप हंगामात सततच्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तर झालेल्या नुकसानीपोटी शासनाने पहिल्यांदाच सततचा पाऊस हा निकष लावून राज्यातील शेतकर्यांसाठी नुकसान भरपाई (Nuksan Bharpai 2022 Maharashtra) जाहीर केली होती.
सततच्या पावसाचे अनुदान मिळवण्यासाठी पात्र लाभार्थी शेतकर्यांना विशिष्ट क्रमांकाद्वारे महा ई सेवा केंद्र (सेतू) मध्ये जाऊन आपली ई – केवायसी पूर्ण करावी लागणार होती.
🛑 महा ई सेवा केंद्र (सेतू) मध्ये ई – केवायसी कशाप्रकारे होते? 👉 येथे पहा
Nuksan Bharpai 2022 Maharashtra
अखेर ई – केवायसी केलेल्या राज्यातील 3 लाख शेतकऱ्यांकरिता मदतीचा 210 कोटी 30 लाख रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याची प्रक्रिया मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आली आहे.
मंत्री श्री. पाटील यांनी संगणकीय प्रणालीवर कळ दाबून निधी वितरणाची प्रक्रिया सुरु केली आहे.
1500 कोटींचा निधी मंजूर
गेल्या पावसाळी हंगामात सततच्या पावसामुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानाकरिता शासनाने विशेष बाब म्हणून 1500 कोटी रुपये इतका निधी मंजूर केला आहे. मदत व पुनर्वसन विभागाने निश्चित केलेल्या डीबीटी प्रणालीमार्फत या निधीचे वितरण सुरु आहे.
👇👇👇
कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळणार, येथे पहा
आज मंत्रालयामध्ये मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील यांनी या निधी वितरणाबाबत आढावा घेतला. त्यावेळी ई – केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा निधी थेट जमा करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. हा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल.
अडीच लाख शेतकर्यांना आणखी 178 कोटी मिळणार
पुढील शुक्रवारपर्यंत आणखी 2,50,000 शेतकऱ्यांकरिता रु.178.25 कोटी इतका निधी त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी दिली.
त्याचप्रमाणे शेती पिकांच्या नुकसानाकरिता तातडीने मदत मिळावी यासाठी, आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन ई – केवायसी करण्याचे मंत्री श्री.पाटील यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले. ही सेवा नि:शुल्क असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
🌾🌾 खरीप हंगाम 2023-24 चे नवीन हमीभाव जाहीर 🌾🌾
👉👉 खरीप पिकांचे नवीन हमीभाव येथे क्लिक करून पहा 👈👈
तसेच डीबीटी प्रणालीमध्ये काही त्रुटी असल्यास त्या त्रुटीदेखील तातडीने दूर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. शासन शेतकऱ्यांप्रती सजग असून शेतकऱ्यांकरिता कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले. Nuksan Bharpai 2022 Maharashtra
तसेच शेतकऱ्यांकडून लवकरात लवकर ई-केवायसी करून घेण्याच्या सूचना देखील सर्व तहसील ब जिल्हा यंत्रणांना मंत्री श्री.पाटील यांनी दिल्या.
सततच्या पावसामुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानाकरिता ई-केवायसी केलेल्या राज्यातील ३ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २१० कोटी ३० लाख रुपयांच्या मदतीचा निधी थेट जमा करण्याची प्रक्रिया मदत व पुनर्वसन मंत्री @AnilPatil_NCP यांच्या हस्ते सुरु करण्यात आली. pic.twitter.com/nbSNatMQi3
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 28, 2023
____________________________________________
- अशाच प्रकारच्या शेतीविषयक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा. 👉👉 batamikamachi.com
- शेतीविषयक माहिती आणि अपडेट्स तुमच्या व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉइन करा. 👉👉 Whatsapp Group