Osmanabad Pik Vima Update 2022

या जिल्ह्यात पीक विम्याचे पुढील २०० कोटी रुपये लवकरच जमा होणार | Osmanabad Pik Vima Update 2022

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Osmanabad Pik Vima Update 2022: शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2022 च्या पीक विमा संदर्भातील धाराशीव (उस्मानाबाद) जिल्ह्याचे (Osmanabad Pik Vima Update 2022) महत्त्वपूर्ण असे अपडेट समोर आले आहे.

धाराशीव जिल्ह्यातील आमदार मा. राणाजगजितसिंह पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली असून, सविस्तर अपडेट आपण आजच्या ह्या लेखात जाणून घेणार आहोत.

या लेखात तुम्ही काय वाचाल?

Osmanabad Pik Vima Update 2022

धाराशीव जिल्ह्यातील आमदार मा. राणाजगजितसिंह पाटील यांनी खरीप 2022 पीक विम्याचे धाराशीव जिल्ह्याकरिता पुढील 200 कोटी रुपये लवकरच जमा होणार असल्याची माहिती फेसबुकवर पोस्ट करून दिली आहे. Osmanabad Pik Vima Update 2022

नेमके ते काय म्हणाले पाहुयात, “शिंदे-फडणवीस सरकारच्या माध्यमातून जलद गतीने निर्णय होत असून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीप 2022 मधील नुकसानीपोटी लवकरच पुढील टप्प्यातील जवळपास 200 कोटी रुपये जमा होणार आहेत.”

खरीप २०२० पीकविमा लाभार्थी यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

या शेतकर्‍यांना मिळणार लाभ

खरीप हंगाम संपताच विक्रमी वेळेत शेतकऱ्यांच्या खात्यावर दि. 30/11/2022 पासूनच विमा जमा होण्यास सुरुवात झाली असून आजवर 2,93,414 शेतकऱ्यांना 258 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

राज्य सरकारने उर्वरित हप्त्याची रक्कम 724 कोटी रुपये सर्व विमा कंपन्यांना वर्ग करण्याचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. भारतीय कृषी विमा कंपनीला प्राप्त झालेला विमा हप्ता रकमेतून धाराशिव जिल्ह्यातील {Osmanabad Pik Vima Update 2022} नुकसानीची सूचना दिलेल्या व पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना ही रक्कम वितरित करण्यात येणार आहे.

📢 धाराशीव (उस्मानाबाद) जिल्ह्याची अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी 2022 पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

उर्वरित रकमेसाठी लढा सुरू

खरीप 2022 मधील उर्वरित शेतकऱ्यांना लवकरात लवकर विमा रक्कम मिळावी यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीचे महाव्यवस्थापक तथा सहसचिव श्री.सिद्धेश रामसुब्रमण्यम व कृषी विभागाचे प्रधान सचिव श्री.एकनाथ डवले यांच्याशी आपली सातत्याने चर्चा व पाठपुरावा सुरू होता. याचे फलित म्हणून नुकसान भरपाईचा दुसरा टप्पा विपरीत होत आहे.

सदरील रक्कम ही पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार असून ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले नाहीत, त्यांच्याबद्दल धोरण निश्चित करून स्वतंत्र प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना अत्यल्प विमा मिळाला आहे, त्यांचे पंचनामे मिळाल्यानंतर त्याबाबत स्पष्टता घेऊन त्यांना न्याय देण्याच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही निश्चित करण्यात येणार आहे.

यापूर्वी कधीही एवढ्या लवकर नुकसान भरपाई मिळाली नव्हती. मोठ्या संघर्षानंतर 2020 च्या विम्यापोटी आजवर 201 कोटी रुपये मिळाले असून उर्वरित रकमेसाठी लढा सुरू आहे. तसेच 2021 चे देखील 400 कोटी रुपये मिळाले असून उर्वरित रकमेसाठी लढा सुरू आहे.

खरीप पीक विमा २०२२ ची राज्याची आकडेवारी येथे क्लिक करून पहा

शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील

खरीप 2022 च्या आता मिळणाऱ्या 2022 कोटी रुपयांमुळे बहुतांश शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात झालेल्या नुकसानीपोटी एवढ्या लवकर जवळपास 458 कोटी रुपये वितरित होत आहेत. हा एक विक्रमच आहे. यातूनही वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय्य भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत, असे आमदार मा. राणाजगजितसिंह पाटील म्हणाले.

🎥 या संदर्भातील सविस्तर विडिओ पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top