Osmanabad Pik Vima Update 2022: शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा 2022 संदर्भातील पुन्हा एकदा दिलासादायक अपडेट आलेले आहे. खरीप हंगाम 2022 च्या दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा वितरणास सुरुवात झालेली आहे. परंतु हे पीक विमा वाटप नेमके कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झाले आहे?
आणि हेक्टरी किती रक्कम वितरित करण्यात येत आहे, नेमके अपडेट काय आहे? याबाबत संपूर्ण माहिती आपण आज या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
Osmanabad Pik Vima Update 2022
खरीप हंगाम 2022 च्या पीक विमा संदर्भातील धाराशीव (उस्मानाबाद) जिल्ह्याचे (Osmanabad Pik Vima Update 2022) महत्त्वपूर्ण असे हे आहे. धाराशीव जिल्ह्यातील आमदार मा. राणाजगजितसिंह पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली असून, सविस्तर अपडेट आपण आजच्या ह्या लेखात जाणून घेणार आहोत.
खरीप हंगाम 2022 मधील नुकसानीपोटी पहिल्या टप्यात पीक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय कृषी विमा कंपनीकडे राज्य व केंद्र सरकारच्या हप्त्याची रक्कम प्राप्त होताच या आठवड्यात धाराशीव (उस्मानाबाद) जिल्ह्यात 200 कोटी रुपये वितरित करण्याचे विमा कंपनीचे महाव्यवस्थापक तथा सहसंचालक श्री. सिद्धेश रामसुब्रमण्यम यांनी आश्वस्त केले होते. त्या अनुषंगाने धाराशीव (उस्मानाबाद) जिल्ह्यात दिनांक 09 फेब्रुवारी 2023 पासून विमा वितरणास सुरुवात झाली आहे.
खरीप २०२० पीकविमा लाभार्थी यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
200 कोटी रुपये वितरित करण्यास सुरुवात