Pik Vima 2023 Companies: शेतकरी मित्रांनो, राज्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामाचा पीक विमा हा साधारणत: 01 जुलै पासून भरणे सुरू होत असते. त्यातच खरीप हंगाम 2023 पासून राज्य सरकारने आता नवीन पीक विमा कंपन्या (Pik Vima 2023 Companies) विविध जिल्ह्यात कार्यान्वित केल्या आहेत.
पीक विमा 2023 चा शासन निर्णय पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
तर मित्रांनो, खरीप हंगाम 2023 पासून रब्बी हंगाम 2025-26 या 3 वर्षासाठी कोणत्या जिल्ह्यात कोणती पीक विमा कंपनी {Pik Vima 2023 Companies} असेल, हे आपण आजच्या ह्या लेखात सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
येथे क्लिक करून पीएम किसान स्टेट्स चेक करा तुमच्या मोबाईल वरच
Pik Vima 2023 Companies
शेतकरी मित्रांनो, राज्यात खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2025-26 या वर्षांकरिता सदरची योजना खाली नमूद केलेल्या विमा कंपनीकडून (Pik Vima 2023 Companies) संबंधीत जिल्हा समुहामध्ये राबविण्यात येईल.
- समाविष्ट जिल्हे : अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा
- नियुक्त केलेली विमा कंपनी : ओरिएन्टल इंन्शुरन्स कं. लि. पत्ता: मेफेअर टॉवर्स, पहिला मजला, पुणे-मुंबई रोड, वाकडेवाडी, पुणे – 411005, टोल फ्री क्रं. : 1800 11 8485 ई-मेल : pmfby.160000@orientalinsurance.co.in
- समाविष्ट जिल्हे : परभणी, वर्धा, नागपूर
- नियुक्त केलेली विमा कंपनी : आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंन्शुरन्स कं. लि. पत्ता: माणिकचंद आयकॉन, 3 रा मजला, प्लॉट नं. 246, सी विंग, बंडगार्डन, पुणे- 411001 टोल फ्री क्रं. : 1800 103 7712 ई-मेल : customersupportba@icicilombard.com
- समाविष्ट जिल्हे : जालना, गोंदिया, कोल्हापूर
- नियुक्त केलेली विमा कंपनी : युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कं. लि. पत्ता: 103, पहिला मजला, आकृती स्टार, MIDC सेन्ट्रल रोड ,अंधेरी (पूर्व) मुंबई – 400093 टोल फ्री क्रं. : 1800 200 5142 / 1800 200 4030 ई-मेल : contactus@universalsompo.com
खरीप पिकांचे हमीभाव जाहीर, पहा कोणत्या पिकाला किती मिळणार हमीभाव?
- समाविष्ट जिल्हे : नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
- नियुक्त केलेली विमा कंपनी : युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कं. लि. पत्ता: क्षेत्रिय कार्यालय, 2 रा मजला, काकडे बीझ, आयकॉन, ई-स्क्वेअर जवळ, गणेशखिंड रोड, शिवाजीनगर, पुणे – 411016 टोल फ्री क्रं. : 1800 233 7414 ई-मेल : uiicpmfby2023@uiic.co.in
- समाविष्ट जिल्हे : छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड
- नियुक्त केलेली विमा कंपनी : चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कं. लि. पत्ता: वेलस्ली कोर्ट, 3 रा मजला, 15-बी, डॉ आंबेडकर रोड, BMW शोरूमच्या वर, कॅम्प, पुणे- 411001 टोल फ्री क्रं. : 1800 208 9200 ई-मेल : customercare@cholams.murugappa.com
- समाविष्ट जिल्हे : वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार
- नियुक्त केलेली विमा कंपनी : भारतीय कृषि विमा कंपनी पत्ता: मुंबई क्षेत्रिय कार्यालय, स्टॉक एक्सेंज टॉवर्स, 20 वा मजला, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई – 400023 टोल फ्री क्रं. : 1800 419 5004 ई-मेल : pikvima@aicofindia.com
- समाविष्ट जिल्हे : हिंगोली, अकोला, धुळे, पुणे
- नियुक्त केलेली विमा कंपनी : एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि. पत्ता: डी-301, तीसरा मजला, ईस्टर्न बिझनेस डिस्ट्रीक्ट (मॅग्नेट मॉल) लाल बहादूर शास्त्री मार्ग, भांडुप (पश्चिम), मुंबई- 400078. टोल फ्री क्रं. : 1800 266 0700 ई-मेल : pmfby.maharashtra@hdfcergo.com
“या” 14 जिल्ह्यातील शेतकर्यांना सततच्या पावसाचे 1500 कोटी अनुदान मिळणार, पहा जिल्हानिहाय तपशील
- समाविष्ट जिल्हे : यवतमाळ, अमरावती, गडचिरोली
- नियुक्त केलेली विमा कंपनी : रिलायन्स जनरल इंन्शुरन्स कं. लि. पत्ता: पाचवा मजला, विरवानी इंडस्ट्रियल इस्टेटच्या पुढे, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव पूर्व मुंबई-400063. टोल फ्री क्रं. : 1800 102 4088 ई-मेल : rgicl.maharashtraagri@relianceada.com
- समाविष्ट जिल्हे : धाराशिव
- नियुक्त केलेली विमा कंपनी : एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि. पत्ता: डी-301, तीसरा मजला, ईस्टर्न बिझनेस डिस्ट्रीक्ट (मॅग्नेट मॉल) लाल बहादूर शास्त्री मार्ग, भांडुप (पश्चिम), मुंबई- 400078. टोल फ्री क्रं. : 1800 266 0700 ई-मेल : pmfby.maharashtra@hdfcergo.com
- समाविष्ट जिल्हे : लातूर
- नियुक्त केलेली विमा कंपनी : एसबीआय जनरल इंन्शुरन्स कं. लि. पत्ता: के. डी. प्लाझा, पहिला मजला, 289/6-7, नेहरु रोड, सेवन लव हॉटेल जवळ, स्वारगेट, पुणे-411042. टोल फ्री क्रं. : 1800 209 1111 ई-मेल : pmfby.mh@sbigeneral.in
- समाविष्ट जिल्हे : बीड
- नियुक्त केलेली विमा कंपनी : भारतीय कृषि विमा कंपनी पत्ता: मुंबई क्षेत्रिय कार्यालय, स्टॉक एक्सेंज टॉवर्स, 20 वा मजला, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई – 400023 टोल फ्री क्रं. : 1800 419 5004 ई-मेल : pikvima@aicofindia.com
पीक विमा योजनेचे वेळापत्रक
पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकर्यांना पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी खरीप हंगामात 2023 मध्ये 31 जुलै ही अंतिम तारीख असेल, तर 2024 आणि 2025 मध्ये 15 जुलै ही अंतिम तारीख असणार आहे.
याशिवाय रब्बी हंगामात रब्बी ज्वारीसाठी 30 नोव्हेंबर, गहू, हरभरा, कांदा व इतर पिकांसाठी 15 डिसेंबर आणि उन्हाळी भात व उन्हाळी भुईमुगाकरिता 31 मार्च ही शेवटची तारीख असेल.
तर शेतकरी मित्रांनो, अशाप्रकारे आजच्या ह्या लेखात आपण खरीप हंगाम 2023 पासून रब्बी हंगाम 2025-26 पर्यंत राज्यात कोणत्या जिल्ह्यात कोणती पीक विमा कंपनी नियुक्त करण्यात आली आहे, याची सविस्तर माहिती जाणून घेतली आहे.
_____________________________________________________
- अशाच प्रकारच्या शेतीविषयक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा. 👉👉 batamikamachi.com
- शेतीविषयक माहिती आणि अपडेट्स तुमच्या व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉइन करा. 👉👉 Whatsapp Group