Pik Vima List 2020:– शेतकरी मित्रांनो, खरीप २०२० हंगामात धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते व या अनुषंगाने मा.उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठाने जिल्ह्यातील ३,५७,२८७ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश बजाज अलीयांझ जनरल इन्शुरन्स कंपनीला दिले होते. अखेर धाराशिव जिल्ह्यात उद्यापासून २०२० खरीप पीक विमा वाटप सुरू होणार आहे. तालुकानिहाय याद्या तुम्ही या लेखात पाहणार आहात.
आपण खरीप २०२० पीकविमा पात्र लाभार्थी यादी तालुकानिहाय डाऊनलोड करून पाहू शकता. आपल्या नाव, क्षेत्र व खाते क्रमांक यांची खात्री करून घ्यावी.. सर्व लाभार्थ्यांचे पुनश्च अभिनंदन!
खरीप २०२० पीकविमा लाभार्थी यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
Osmanabad Pik Vima 2020
मा.सर्वोच्च न्यायालयाने देखील हे आदेश कायम ठेवले व पिक विमा कंपनीकडून जमा झालेल्या रु. २०० कोटी व त्यावरील व्याजासह रु.२०१.३४ कोटीचा धनाकर्ष जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव (उस्मानाबाद) यांच्याकडे दिनांक २०/१०/२०२२ रोजी सुपूर्द केला आहे. सदरील धनाकर्ष दि. २१/१०/२०२२ रोजी बँकेत जमा करण्यात आला असून साधारणतः २७/१०/२०२२ रोजी प्रत्यक्षात खात्यावर पैसे उपलब्ध होणे अपेक्षित आहे.
विमा कंपनीने ४०% नुकसान गृहीत धरून रू. १८,०००/- प्रति हेक्टर नुकसान भरपाई देण्याचे आपल्या मागणी प्रमाणे मान्य केले आहे. याप्रमाणे संपूर्ण देय्य रक्कम रू. ५३१ कोटी आहे. परंतु, कंपनीने २,०३,६६६ शेतकऱ्यांची यादी दिल्यानंतर पुढील १,५३,६२१ शेतकऱ्यांची यादी देण्यास चालढकल सुरू केली आहे.
Kharip Pik Vima List Download
आजवर योजनाबद्ध रीतीने कार्य केल्यामुळे खरीप २०२० पीकविम्याची रू.२०१.३४ कोटींची रक्कम उपलब्ध होऊन, शेतकऱ्यांना लवकरच वितरित होणार आहे. पुढील रक्कम लवकरात लवकर उपलब्ध होण्यासाठी विभागवार योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
धाराशीव जिल्हा खरीप २०२० पीकविमा लाभार्थी यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वरील लिंक वर जाऊन आपण खरीप २०२० पीकविमा पात्र लाभार्थी यादी तालुकानिहाय डाऊनलोड करून पाहू शकता.
आपल्या नाव, क्षेत्र व खाते क्रमांक यांची खात्री करून घ्यावी.. सर्व लाभार्थ्यांचे पुनश्च अभिनंदन!
तर शेतकरी मित्रांनो, अशाप्रकारे तुम्ही वरील तालुक्याच्या नावावर क्लिक करून त्या तालुक्याची खरीप २०२० ची पीक विमा यादी डाऊनलोड करून तुमच्या मोबाइल वर पाहू शकता. ही माहिती उपयुक्त आणि माहितीपूर्ण अशी आहे त्यामुळे ही पोस्ट जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत नक्की शेअर करा. तसेच ताज्या बातम्या, विविध शासकीय योजना, शेतीविषयक माहिती आणि इतरही बरीच उपयुक्त माहितीसाठी आमच्या बातमी कामाची (www.batamikamachi.com) या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.
*आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा: 👉👉 शेतकरी योजना ग्रुप