Pik Vima Maharashtra:- शेतकरी मित्रांनो, विविध नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण होणार्या प्रतिकूल परिस्थितीत शेतीपिकांचे नुकसान झाल्यावर पिकांना झालेल्या नुकसानीसाठी भरपाई मिळावी म्हणून राज्यात पंतप्रधान पीक विमा योजना (Pik Vima Maharashtra) दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामात राबविली जात असते.
*आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा: 👉👉 शेतकरी योजना ग्रुप
Pik Vima Maharashtra
खरीप हंगाम २०२१ (Kharip Pik Vima 2022) मध्ये ही योजना राबविली जात असताना, राज्यात सुरूवातीलाच अतिवृष्टी तसेच सततच्या पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे पीक विमा धारक शेतकर्यांनी झालेल्या पीक नुकसानीचे दावे मोठ्या प्रमाणावर दाखल केले होते. परंतू नुकसान होऊनसुद्धा बर्याच ठिकाणी शेतकरी बांधवांना पीक विमा परतावा म्हणून अतिशय तोकडी रक्कम मिळाली होती. यामध्ये १००० रुपयांपेक्षाही कमी पीक विमा शेतकर्यांना मिळाला होता. आम्हाला तर फक्त ३३१ रुपये पीक विमा भरपाई मिळाली होती. pik vima maharashtra
तर आता अशा कमी पीक विमा मिळालेल्या बर्याच शेतकर्यांना दुबार पीक विमा दिला जाणार आहे, त्यासंबंधीचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत.
पीक विमा रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर
फक्त “या” शेतकर्यांना मिळणार दुबार पीक विमा (Pik Vima 2021)
प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या (PMFBY) मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येत असून काही प्रकरणी पीक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात वितरीत होत आहे. अशा प्रकरणांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना विम्याच्या परताव्यापोटी नुकसान भरपाई रक्कम रु. १०००/- पेक्षा कमी येत असल्याने किमान रक्कम रु.१०००/ अदा करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असून, परिपत्रकान्वये सदर योजनेसंदर्भातील अवलंबवयाची कार्यपध्दती आणि अटी व शर्ती विहीत करण्यात आल्या आहेत. कृषि आयुक्तालयाच्या पत्रान्वये मागणी केल्यानुसार “प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुरक अनुदान” योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप २०२१ करीता रु.६,९८,६१,८६९/- (६ कोटी ९८ लक्ष ६१ हजार ८६९ रुपये) इतकी रक्कम वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ज्या शेतकर्यांना खरीप हंगाम २०२१ मध्ये पीक विमा (Crop Insurance) रक्कम म्हणून १००० रुपयांपेक्षा कमी पीक विमा मिळाला होता, फक्त त्याच शेतकर्यांना ही रक्कम वितरीत करण्यात येणार आहे.