Pik Vima Manjur: पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2022 चा पीक विमा येत्या 15 दिवसांत शेतकर्यांच्या खात्यात जमा होणार (Pik Vima Manjur) असल्याची माहिती, काल (दि. 14/03/2023) विधानसभेत राज्याचे कृषिमंत्री मा. अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.
पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भरपाई देत असून उर्वरित 503 कोटी रुपयांची रक्कम पुढील 15 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी घोषणा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल विधानसभेत केली.
Pik Vima Manjur
शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2022 मध्ये अतिवृष्टी तसेच सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीपिकांचे नुकसान झाले होते, त्यामुळे पीक विमा काढलेल्या शेतकर्यांना आशा होती की यावर्षी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने चांगला पीक विमा मिळेल.
अशातच मध्यंतरी बर्याच शेतकर्यांना पीक विमा मिळाला आहे, परंतु अनेक शेतकरी अद्यापही पीक विम्याच्या लाभापासून वंचित असून, पण त्यांनाही आता मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत पीक विमा मिळून जाणार आहे.
आठ जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणार, पहा कोणते आहेत ते 8 जिल्हे?
503 कोटींचा पीक विमा मिळणार
पीक विम्याचे एकूण 63 लाख 11 हजार 235 लाभार्थी आहेत. त्यानुसार 50 लाख 98 हजार 99 शेतकऱ्यांना 2 कोटी 356 लाख भरपाई मिळाली आहे. मात्र 503 कोटी रुपयांची पीक विम्याची रक्कम प्रलंबित असून ती पुढील 15 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. असे कृषिमंत्री सत्तार म्हणाले.
तसेच सरकारने पीक विम्यासाठी केवळ एक रुपयांत नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी 3 हजार 312 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 2 हजार 342 कोटी रुपये बँक खात्यात जमा केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तर मित्रांनो, अशाप्रकारे येत्या 15 दिवसांत पीक विम्याचे उर्वरित पैसे जमा होणार आहे. त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत नक्की शेअर करा आणि इतर सर्व योजनांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या www.batamikamachi.com वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.