Pik Vima Yojana: शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान पीक विमा योजना (Pik Vima Yojana) संदर्भातील अतिशय महत्त्वपूर्ण असे अपडेट आले असून, पीक विमा योजनेसाठी एकूण 37 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
खरीप पीक विमा 2021 करिता 78 लाख 11 हजार 844 रुपये आणि रब्बी पीक विमा 2021 करिता 36 कोटी 28 लाख 83 हजार 680 रुपये असा 37 कोटीपेक्षा जास्त निधी राज्य हिस्सा विमा हप्ता म्हणून विमा कंपन्यास अदा करण्यासाठी शासन मंजूरी देण्यात आली आहे. त्याबाबतच्या शासन निर्णयांचा थोडक्यात आढावा आपण आजच्या ह्या लेखात पाहणार आहोत.
Pik Vima Yojana
पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत (Pik Vima Yojana) खरीप पीक विमा 2021 करिता 78 लाख 11 हजार 844 रुपये आणि रब्बी पीक विमा 2021 करिता 36 कोटी 28 लाख 83 हजार 680 रुपये असा 37 कोटीपेक्षा जास्त निधी राज्य शासनाने पीक विमा हप्ता म्हणून विमा कंपन्यास निधी वितरीत करण्यास मान्यता दिली आहे. म्हणजेच आता विमा कंपन्यांना हा निधी उपलब्ध झाल्याने विमा कंपन्या खरीप हंगाम 2021 आणि रब्बी हंगाम 2021 चा पीक विमा शेतकर्यांना वाटप करू शकतात.
खरीप पीक विमा 2021
प्रधानमंत्री पिक विमा योजना {Pik Vima Yojana} खरीप 2020 व रब्बी हंगाम 2020-21 पासून तीन वर्षाकरीता भारतीय कृषि विमा कंपनी, इफ्को टोकिओ जनरल इन्शुरन्स कं. लि., रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं. लि., भारती ॲक्सा जनरल इन्शुरन्स कं. लि., बजाज अलियान्स इंशुरन्स कंपनी लि. व एचडीएफसी इर्गो इन्शुरन्स कं. लि या 6 विमा कंपन्यांमार्फत राबविण्यात येत होती.
भारतीय कृषि विमा कंपनी ही राज्यात विमा कंपन्यांची समन्वयक कंपनी आहे. भारतीय कृषि विमा कंपनीने प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2021 अंतर्गत उपरोक्त 6 कंपन्यांचा एकत्रित मिळून पिक विमा हप्ता अनुदानापोटी उर्वरीत राज्य शासन हिस्सा अनुदानाची मागणी केलेली आहे.
केंद्र शासनाच्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांनुसार प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम 2021 ची विमा हप्त्याची उर्वरीत राज्य हिस्सा रक्कम रु. 78,11,844/- विमा कंपन्यांना दि.31/03/2023 पर्यंत अदा करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने आयुक्त कार्यालयाने केलेल्या विनंतीस अनुसरून रु. 78,11,844/- (अक्षरी रक्कम रु. अठ्याहत्तर लाख अकरा हजार आठशे चव्वेचाळीस फक्त) इतकी रक्कम पिक विमा हप्त्यापोटी उर्वरीत राज्य हिस्सा अनुदान विमा कंपन्यांस अदा करण्यासाठी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, म्हणून त्यासाठी दिनांक 08 मार्च 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
शासन निर्णय:
भारतीय कृषि विमा विमा कंपनीने सादर केलेली मागणी, कृषि आयुक्तालयाची शिफारस आणि केंद्र शासनाच्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांचा विचार करता प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2021 अंतर्गत पिक विमा हप्ता अनुदानापोटी उर्वरीत राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदान रक्कम रु. 78,11,844/- (अक्षरी रक्कम रु. अठ्याहत्तर लाख अकरा हजार आठशे चव्वेचाळीस फक्त) खालीलप्रमाणे वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
कोणत्या कंपनीस किती निधी मिळणार? येथे पहा
रब्बी पीक विमा 2021
प्रधानमंत्री पिक विमा योजना {Pik Vima Yojana} खरीप 2020 व रब्बी हंगाम 2020-21 पासून तीन वर्षाकरीता भारतीय कृषि विमा कंपनी, इफ्को टोकिओ जनरल इन्शुरन्स कं. लि., रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं. लि., भारती ॲक्सा जनरल इन्शुरन्स कं. लि., बजाज अलियान्स इंशुरन्स कंपनी लि. व एचडीएफसी इर्गो इन्शुरन्स कं. लि या 6 विमा कंपन्यांमार्फत राबविण्यात येत होती.
भारतीय कृषि विमा कंपनी ही राज्यात विमा कंपन्यांची समन्वयक कंपनी आहे. भारतीय कृषि विमा कंपनीने प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 2021-22 अंतर्गत उपरोक्त 6 कंपन्यांचा एकत्रित मिळून पिक विमा हप्ता अनुदानापोटी उर्वरीत राज्य शासन हिस्सा अनुदानाची मागणी केलेली आहे.
केंद्र शासनाच्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांनुसार प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत रब्बी हंगाम 2021-22 ची विमा हप्त्याची उर्वरीत राज्य हिस्सा रक्कम विमा कंपन्यांना दि.31 मार्च 2023 अखेर अदा करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने आयुक्त कार्यालयाने केलेल्या विनंतीस अनुसरून रु. 36,28,83,680/- इतकी रक्कम पिक विमा हप्ता अनुदानापोटी विमा कंपन्यांस अदा करण्यासाठी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, म्हणून शासन निर्णय घेण्यात आला आहे.
शासन निर्णय:
भारतीय कृषि विमा विमा कंपनीने सादर केलेली मागणी, कृषि आयुक्तालयाची शिफारस आणि केंद्र शासनाच्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांमधील बाबींचा विचार करता प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 2021-22 अंतर्गत पिक विमा हप्ता अनुदानापोटी उर्वरीत राज्य शासन हिस्सा अनुदानाच्या हप्त्यापोटी रु. 36,28,83,680/-(अक्षरी रक्कम रु. छत्तीस कोटी अठ्ठाविस लाख त्र्याऐंशी हजार सहाशे ऐंशी फक्त) इतके अनुदान खालीलप्रमाणे वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
कोणत्या कंपनीस किती निधी मिळणार? येथे पहा
तर मित्रांनो, अशाप्रकारे खरीप पीक विमा 2021 करिता 78 लाख 11 हजार 844 रुपये आणि रब्बी पीक विमा 2021 करिता 36 कोटी 28 लाख 83 हजार 680 रुपये असा 37 कोटीपेक्षा जास्त निधी राज्य हिस्सा विमा हप्ता म्हणून विमा कंपन्यास अदा करण्यासाठी शासन मंजूरी देण्यात आली आहे.