PM Kisan 16th Installment

PM Kisan 16th Installment : पीएम किसानच्या हप्त्यात होणार वाढ, आता मिळणार वर्षाचे “एवढे” पैसे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan 16th Installment: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 16 व्या (PM Kisan 16th Installment) हप्त्याआधी लाभार्थी शेतकर्‍यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. पीएम किसान योजनेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

तर तो बदल कोणता आहे? हे आपण आजच्या ह्या लेखात जाणून घेणार आहोत.

👨‍🌾 तुमचे आधार कोणत्या बँकेला लिंक आहे? असे चेक करा

PM Kisan 16th Installment

शेतकरी बांधवांचा सन्मान करण्यासाठी केंद्र शासनाने 1 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली. लाभार्थी शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एका हप्त्यात रुपये 2,000 आणि वार्षिक 6,000 रुपये मिळतात. हे पैसे सरकार तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाइन ट्रान्सफर करते. प्रत्येक वेळी सरकार बँक खात्यात 2,000 रुपये ट्रान्सफर करते. हा हप्ता दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर येतो.

आतापर्यंत या योजनेचे 15 हप्ते लाभार्थी शेतकर्‍यांना वितरीत करण्यात आले आहेत. तर 16 वा हप्ता लवकरच वितरीत केला जाणार आहे. पण हा हप्ता वितरीत करण्याआधी केंद्र सरकार पीएम किसान योजनेच्या हप्त्यात 50% वाढ करण्याची शक्यता आहे. याबाबत ‘द इकॉनामिक टाइम्स’ ने माहिती दिली आहे.

👨‍🌾असे चेक करा नमो शेतकरी योजनेचे स्टेट्स, 1 ला हप्ता आला की नाही माहीत करा!

पीएम किसान योजनेत आता 2000 रूपयाऐवजी 3000 रुपये मिळणार

येत्या बजेटमध्ये ही रक्कम 6,000 रुपयांवरून 9,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात येऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार पीएम किसान योजनेंतर्गत मिळणाऱ्या पैशात थेट 50 टक्के वाढ करू शकते. म्हणजे लाभार्थी शेतकर्‍यांना 2000 रूपयाच्या हप्त्याऐवजी 3000 रूपयांचा हप्ता मिळू शकतो.

यासंदर्भात मध्यप्रदेश येथील स्थानिक भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी देखील सोशल मीडिया वर माहिती दिली आहे.

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top