PM Kisan Beneficiary List Village Wise

PM Kisan Beneficiary List Village Wise : पीएम किसान योजनेची गावनिहाय नवीन लाभार्थी यादी पहा, यादीत तुमचे नाव चेक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Beneficiary List Village Wise: देशभरातील शेतकर्‍यांसाठी केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान) सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील शेतकर्‍यांना प्रत्येकी 4 महिन्यातून एकदा 2000 रूपयांचा हप्ता वितरित करण्यात येत असतो. म्हणजेच वार्षिक 6000 रुपये शेतकर्‍यांना मिळतात.

आतापर्यंत पीएम किसान योजनेचे 15 हप्ते वितरित करण्यात आले असून, 16 वा हप्तासुद्धा लवकरच शेतकर्‍यांना मिळणार आहे. पीएम किसानच्या 16 व्या हप्त्याच्या वितरणाची तयारी केंद्र शासनाने पूर्ण केली आहे. आता या योजेनेच्या लाभार्थी याद्यासुद्धा अपडेट करण्यात आल्या आहेत.

📃तुमचे पीएम किसान स्टेट्स येथे जाणून घ्या

तर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांची गावनिहाय यादी (PM Kisan Beneficiary List Village Wise) नेमकी कशी पाहता येईल? याची संपूर्ण माहिती आजच्या ह्या लेखात आपण जाणून घेणार आहोत.

PM Kisan Beneficiary List Village Wise

पीएम किसान योजनेच्या गावनिहाय लाभार्थी याद्या तुमच्या मोबाईल वरही पाहता येतील, त्यासाठी खाली नमूद केलेल्या स्टेप्स फॉलो करा.

  • सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये Chrome ब्राउझर मध्ये पीएम किसान योजनेची अधिकृत वेबसाईट https://pmkisan.gov.in/ ओपन करून घ्यावी.
  • पीएम किसान योजनेची वेबसाईट ओपन झाल्यानंतर थोडं खाली आल्यावर तुम्हाला Farmers Corner दिसेल, ज्यामध्ये 6व्या क्रमांकावर BENIFICIARY LIST हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे.
  • BENIFICIARY LIST ह्या पर्यायावर क्लिक केल्यावर खाली चित्रात दाखविल्याप्रमाणे तुम्हाला गावनिहाय लाभार्थी यादी पाहण्याचा पर्याय दिसेल.

  • वरील चित्रात दाखविल्याप्रमाणे तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडून Get Report या बटणावर क्लिक करावे.
  • त्यानंतर तुम्हाला निवडलेल्या गावाची संपूर्ण पीएम किसान योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी दिसेल.

आता “ह्याच” लाभार्थ्यांना मिळेल पीएम किसान योजनेचे पुढील हप्ते

पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीत तुमचे नाव असेल तरच तुम्हाला यापुढे पीएम किसान योजनेचे पुढील हप्ते मिळत राहतील. आणि समजा या यादीत तुमचे नाव नसेल तर मात्र तुम्हाला तुमचे पीएम किसान स्टेट्स चेक करून तुमच्या अकाऊंट मध्ये काही त्रुटी असतील तर त्या दूर कराव्या लागणार आहेत.

PM Kisan Beneficiary Status : पीएम किसान स्टेट्स चेक करा तुमच्या मोबाईल वरच

“या” 3 बाबी पूर्ण असतील तरच मिळेल पुढील हप्ते

पीएम किसान स्टेट्स चेक केल्यानंतर ELIGIBILITY STATUS मध्ये Land Seeding , e-KYC Status आणि Aadhaar Bank Account Seeding Status समोर जर Yes दाखवत असेल, तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता हा मिळणार आहे. अन्यथा या 3 बाबींपैकी कोणतीही बाब No दाखवत असेल तर मात्र तुम्हाला सन्मान निधी योजनेचे हप्ते मिळणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला ती त्रुटी दूर करावी लागेल.

खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे तुमचे ELIGIBILITY STATUS मध्ये Land Seeding , e-KYC Status आणि Aadhaar Bank Account Seeding Status समोर जर Yes दाखवत असेल तर तुम्हाला पुढील हप्ते मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही.

pm-kisan-status
pm-kisan-status

 

तर शेतकरी मित्रांनो, अशाप्रकारे वरील स्टेप नुसार तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांची गावनिहाय यादी (PM Kisan Beneficiary List Village Wise) पाहू शकता. ही माहिती शेतकरी बांधवांसाठी अत्यंत उपयुक्त आहे, त्यामुळे ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर नक्की करा.

______________________________

  • अशाच प्रकारच्या शेतीविषयक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा. 👉👉 batamikamachi.com

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top