PM Kisan Beneficiary Status

PM Kisan Beneficiary Status : पीएम किसान स्टेट्स चेक करा तुमच्या मोबाईल वरच

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Beneficiary Status:  शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता येत्या काही दिवसातच वितरीत केला जाणार आहे, आणि सोबतच महाराष्ट्र शासनाची नवीन योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता देखील सोबतच वितरीत केला जाणार आहे.

त्यामुळे हे दोन्ही हप्ते वितरीत होण्याआधी तुम्हाला पीएम किसान स्टेट्स (PM Kisan Beneficiary Status) चेक करावे लागेल, आणि त्यामध्ये कोणतीही त्रुटी नसल्याची खात्री करावी लागेल. त्यामुळे पीएम किसान स्टेट्स {PM Kisan Beneficiary Status} आपल्या मोबाईल वरच कसे चेक करावे? हे आपण आजच्या ह्या लेखात जाणून घेणार आहोत.

👉👉 नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी हे शेतकरी ठरतील अपात्र 👈👈

PM Kisan Beneficiary Status

मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचे स्टेट्स चेक करण्यासाठी तुम्हाला तुमचे Registration ID माहित असणे आवश्यक आहे. रजिस्ट्रेशन आयडी (Registration ID) कसा काढावा हे आपण सर्वप्रथम पाहुयात.

असे माहीत करा तुमचा Registration ID

  • Registration ID माहीत करून घेण्यासाठी सर्वप्रथम पीएम किसान योजनेची अधिकृत वेबसाईट https://pmkisan.gov.in/ ही तुमच्या मोबाईल वर ओपन करून घ्यावी.
  • त्यानंतर Farmers Corner या सदराखाली तुम्हाला “Know Your Status” हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करावे.
  • “Know Your Status” हा नवीन पेज ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला “KNOW YOUR REGISTRATION NUMBER” या नावाने एक लिंक दिसेल, त्यावर क्लिक करावे. त्यावर क्लिक केल्यावर पुन्हा एक नवीन पेज ओपन होईल.
  • “KNOW YOUR REGISTRATION NUMBER” हे पेज ओपन झाल्यावर तिथे तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा तुमचा आधार क्रमांक टाकून तुमचे Registration ID पाहता येणार आहे.
  • Registration ID मिळाल्यानंतर आता तुम्हाला तुमचे पीएम किसान स्टेट्स {PM Kisan Beneficiary Status}  पाहता येईल.

👇👇👇

👉👉 तुमचे आधार कोणत्या बँक खात्यास लिंक आहे, येथे चेक करा 👈👈

असे चेक करा पीएम किसान स्टेट्स

वरील स्टेप मध्ये तुम्हाला तुमचा Registration ID मिळून जाईल, आता त्या रजिस्ट्रेशन आयडी (Registration ID) च्या साहाय्याने तुम्ही पीएम किसान स्टेट्स (PM Kisan Beneficiary Status) पाहू शकता. त्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

  • सर्वप्रथम पीएम किसान योजनेची अधिकृत वेबसाईट https://pmkisan.gov.in/ ही तुमच्या मोबाईल वर ओपन करून घ्यावी.
  • त्यानंतर Farmers Corner या सदराखाली तुम्हाला “Know Your Status” हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करावे.
  • “Know Your Status” हा नवीन पेज ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी Enter Registration No. हा पर्याय दिसेल, त्याखालील बॉक्स मध्ये तुमचा रजिस्ट्रेशन आयडी (Registration ID) नमूद करावा.
  • Registration ID टाकून Captcha Code टाकावा. आणि Get Details या बटणावर क्लिक करावे.
  • Get Details या बटणावर क्लिक केल्यानंतर तुमचे पीएम किसान स्टेट्स (PM Kisan Status) तुम्हाला दिसेल.
  • यामध्ये तुमची PERSONAL INFORMATION, ELIGIBILITY STATUS आणि LATEST INSTALLMENT DETAILS या बाबी तुम्हाला पाहता येईल.

 

अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा GR आला, पहा अशी असेल योजनेची पात्रता आणि कार्यपद्धती

“या” 3 बाबी पूर्ण असेल, तरच मिळतील पुढील हप्ते

पीएम किसान स्टेट्स चेक केल्यानंतर ELIGIBILITY STATUS मध्ये Land Seeding , e-KYC Status आणि Aadhaar Bank Account Seeding Status समोर जर Yes दाखवत असेल, तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता हा मिळणार आहे. अन्यथा या 3 बाबींपैकी कोणतीही बाब No दाखवत असेल तर मात्र तुम्हाला सन्मान निधी योजनेचे हप्ते मिळणार नाहीत.

खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे तुमचे ELIGIBILITY STATUS मध्ये Land Seeding , e-KYC Status आणि Aadhaar Bank Account Seeding Status समोर जर Yes दाखवत असेल तर तुम्हाला पुढील हप्ते मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही.

pm-kisan-status

 

तर शेतकरी मित्रांनो, अशाप्रकारे वरील स्टेप नुसार तुम्ही तुमचे पीएम किसान स्टेट्स चेक करू शकता. ही माहिती शेतकरी बांधवांसाठी अत्यंत उपयुक्त आहे, त्यामुळे ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर नक्की करा.

______________________________

  • अशाच प्रकारच्या शेतीविषयक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा. 👉👉 batamikamachi.com
  • शेतीविषयक माहिती आणि अपडेट्स तुमच्या व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉइन करा. 👉👉 Whatsapp Group

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top