Ration Card Number: आपल्या रेशन कार्डचा 12 अंकी विशिष्ट क्रमांक म्हणजेच रेशन कार्ड नंबर (Ration Card Number Maharashtra) कसा माहीती करावा, ह्याची सर्वात सोपी पद्धत आपण आजच्या ह्या लेखात जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्रात मागील काही वर्षापासून रेशन कार्डला सर्व सदस्यांचे आधार क्रमांक लिंक करून रेशन कार्ड ऑनलाइन करण्यात आले आहेत. त्यामुळे रेशन कार्डला एक 12 अंकी विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे. यालाच RC Number किंवा Ration Card Number Maharashtra असे म्हणतात.
Ration Card Number Maharashtra
कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड मागितले असेल तर त्या ठिकाणी रेशन कार्ड नंबर विचारला जातो किंवा तुम्हाला नेमकं किती रेशन मिळते, त्यापैकी दुकानदार किती रेशन देतो, हे माहीत करण्यासाठी देखील रेशन कार्ड नंबर अत्यंत गरजेचा असतो.
सध्या रेशन कार्डवर अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, त्यासाठी अर्ज सुरू असून, अर्ज करण्यासाठी देखील रेशन कार्ड नंबर {Ration Card Number Maharashtra} माहीत असणे आवश्यक आहे. म्हणूनच आजच्या ह्या लेखात तुमचा 12 अंकी रेशन कार्ड नंबर कसा चेक करावा? तेही तुमच्या मोबाईल वरच, ह्याची माहिती आपण आजच्या ह्या लेखात पाहणार आहोत.
रेशन कार्डवर अन्नधान्याऐवजी पैसे मिळणार, असा करा अर्ज
असा चेक करा तुमचा 12 अंकी Ration Card Number
रेशन कार्ड नवीन पद्धतीने चेक करण्यासाठी तुमच्या जवळ Android Smartphone आणि तुमच्या रेशन कार्डवरील कोणत्याही एका सदस्याचा आधार क्रमांक असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो करून तुमचा रेशन कार्ड नंबर मिळवता येईल.
- सर्वप्रथम तुमच्या Android मोबाईल मधील Google Play Store वर जावे.
- Google Play Store मध्ये वरच्या बाजुला सर्च बार असेल, त्या सर्च बार मध्ये “Mera Ration” हे केंद्र शासनाकडून जारी करण्यात आलेले मोबाईल अॅप्लिकेशन सर्च करून “Mera Ration” अॅप्लिकेशन इंस्टॉल करून ते ओपन करून घ्यावे.
- “Mera Ration” हे अॅप्लिकेशन ओपन झाल्यानंतर काही महत्त्वाच्या परमिशन तुम्हाला Allow कराव्या लागतील. त्यानंतर अॅप्लिकेशनच्या Home Screen वर तुम्हाला एकूण 10 ऑप्शन दिसतील.
- होम स्क्रीन वर दिसत असलेल्या ऑप्शनमधून 7 व्या क्रमांकावरील “Aadhar Seeding” ह्या ऑप्शनवर क्लिक करावे.
- “Aadhar Seeding” या ऑप्शनवर क्लिक केल्यावर आता तुम्हाला “Ration Card No” आणि “Aadhar No” असे दोन पर्याय दिसतील. आणि खाली सबमीट बटन दिसेल. तर यामधून तुम्ही “Aadhar No” हा ऑप्शन सिलेक्ट करून तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याचे आधार क्रमांक त्या ठिकाणी अचूकरीत्या नमूद करून घ्यावे. आणि सबमीट बटणावर क्लिक करावे.
- सबमीट बटणावर क्लिक केल्यावर आता तुमच्या रेशन कार्डचा संपूर्ण तपशील तुम्हाला दिसेल.
- ज्यामध्ये Home State म्हणजे तुमचे राज्य, Home District म्हणजे तुमचा जिल्हा, Scheme म्हणजे तुम्हाला कोणत्या योजनेअंतर्गत रेशन मिळत आहे, त्यानंतर Card Number दिसेल. आणि खाली रेशन कार्डवर सर्व सदस्यांची नावे आणि त्यांचे आधार क्रमांक सिडिंग आहे की नाही, ही माहिती दिसेल.
- तर यामध्ये तुम्हाला Card Number दिसेल, जो की 12 अंकी असेल, तोच तुमचा रेशन कार्ड क्रमांक {Ration Card Number Maharashtra} असणार आहे.
तर मित्रांनो, अशाप्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवरच तुमचा 12 अंकी रेशन कार्ड नंबर चेक करू शकता. त्यासाठी केंद्र शासनाचे “Mera Ration” हे मोबाईल अप्लीकेशन तुम्ही डाऊनलोड करून घ्यावे.
“Mera Ration” हे अप्लीकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
मित्रांनो, ही अत्यंत उपयुक्त अशी पोस्ट सर्वांसाठी फायद्याची आहे, त्यामुळे ही पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या उपयुक्त आणि माहितीपूर्ण पोस्ट वाचण्यासाठी आमच्या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.
📢 IPL 2023: संपूर्ण वेळापत्रक | IPL Schedule 2023
📢 ST प्रवासात महिलांना आता 50% सुट, महिला सन्मान योजना सुरू | Mahila Sanman Yojana Maharashtra 2023