RR vs PBKS 2023: गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या आयपीएल 2023 च्या 8व्या सामन्यात (RR vs PBKS 2023) पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सचा 5 धावांनी रोमांचकारी पराभव करत स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबने निर्धारित 20 षटकांत 4 गडी गमावत 197 धावा केल्या, त्याला प्रत्युत्तरात राजस्थानच्या संघाने शेवटच्या चेंडूपर्यंत खिंड लढवत 20 षटकांत 7 गडी गमावत 192 धावा केल्या आणि सामना 5 धावांनी गमावला.
RR vs PBKS 2023
नाणेफेक जिंकल्यानंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय लवकरच चुकीचा ठरला. पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवन (34 चेंडूत 86 धावा) आणि प्रभसिमरन सिंग (34 चेंडूत 60 धावा) यांच्या झंझावाती अर्धशतकांच्या जोरावर पंजाब किंग्जने पहिल्या डावात 20 षटकात 4 गडी गमावून 197 धावा केल्या.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जचा सलामीवीर प्रभसिमरन सिंग आणि कर्णधार शिखर धवनने पहिल्या विकेटसाठी 90 धावा जोडल्या. याशिवाय यष्टीरक्षक जितेश शर्माने 16 चेंडूत 27 धावांची आक्रमक खेळी खेळली. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सकडून होल्डरने दोन, चहलने एक आणि आर अश्विनने एक विकेट घेतली.
📃 आयपीएल 2023 चे वेळापत्रक 👉 PDF डाऊनलोड करा
खराब सुरुवातीनंतर हेटमायेर – जुरेलची फटकेबाजी
198 धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाकडून यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलरच्या जागी रविचंद्रन अश्विन सलामीला आला. झेल घेताना जोस बटलर जखमी झाला होता. यशस्वी जैस्वाल आठ चेंडूत 11 धावा करून अर्शदीप सिंगची बळी ठरला.
त्याचवेळी अर्शदीप सिंगने रविचंद्रन अश्विनला शून्यावर बाद केले. संघाची धावसंख्या 3.2 षटकात 2 विकेट्स वर 26 धावा होती. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जोस बटलरला अवघ्या 19 धावांवर बाद करून नॅथन एलिसने राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का दिला.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने एका टोकाला चांगली फलंदाजी करत 25 चेंडूत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 42 धावा केल्या. संजू नॅथन एलिसचा दुसरा बळी ठरला. राजस्थान रॉयल्सच्या चार विकेट 100 धावापूर्वीच पडल्या. यानंतर रियान परागने 12 चेंडूत 20 धावांची आक्रमक खेळी करत संघाला सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. नॅथन एलिसने देवदत्त पडिकल आणि रियान पराग यांना बाद करत राजस्थान रॉयल्सला अडचणीत आणले.
सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शिमरेन हेटमायरने आपल्या आक्रमक वेगवान फलंदाजीमुळे राजस्थानला सामन्यात परत आणले. सॅम करनच्या 18 व्या षटकात हेटमायरने दोन षटकार आणि एक चौकाराच्या मदतीने 19 धावा करत सामन्याचा कल बदलला.
RR vs PBKS 2023 शेवटच्या षटकाचा थरार
शेवटच्या दोन षटकात राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 34 धावांची गरज होती. अर्शदीप सिंगच्या 19व्या षटकात हेटमायेर आणि ध्रुव जुरेल या दोघांनी दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 18 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सला शेवटच्या षटकात 16 धावांची गरज होती पण सॅम करनने फक्त 10 धावा दिल्या आणि राजस्थान रॉयल्स ने 5 धावांनी हा सामना गमावला.
RR vs PBKS 2023 सामन्याचे संपूर्ण स्कोरकार्ड 👉👉 येथे पहा
RR vs PBKS 2023 सामन्याचे संपूर्ण Highlights 👉👉 येथे पहा