Salokha Yojana Maharashtra

राज्यात सलोखा योजनेस सुरुवात, जाणून घ्या काय आहे सलोखा योजना? | Salokha Yojana Maharashtra

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Salokha Yojana Maharashtra: मित्रांनो, आपल्या देशात शेतजमिनीमुळे वर्षानुवर्षे आपापसांत वाद होत राहतात. हे वाद इतके मोठे असतात की अगदी पिढ्या-न-पिढ्या चालत राहतात. ह्या वादांमुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.

म्हणूनच शेतीमधील वहिवाटी संदर्भात गावपातळीवर होणारे वाद संपुष्ठात आणण्यासाठी शासनाने आता सलोखा योजना (Salokha Yojana Maharashtra) सुरू केली आहे. महसूल विभागामार्फत सलोखा योजना राबविण्यात येणार आहे.

सलोखा योजनेमुळे शेतजमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांतील आपआपसातील वाद मिटविण्यासाठी आणि समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य व सौहार्द वाढीस लागण्यासाठी मदत होणार आहे.

Salokha Yojana Maharashtra

किमान 12 वर्षांपासून एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी मुद्रांक शुल्क नाममात्र एक हजार रुपये आणि नोंदणी शुल्क नाममात्र एक हजार रुपये आकारण्याबाबत सवलत देण्यासाठी ही “सलोखा योजना” {Salokha Yojana Maharashtra} राबविण्यात येत आहे. शुल्कामध्ये सवलत शासन निर्णयाच्या दिनांकापासून पुढील दोन वर्षे राहील.

दिनांक 13 डिसेंबर 2022 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत सलोखा योजनेला (Salokha Yojana) मंत्रिमंडळ मान्यता देण्यात आली होती. मंत्रिमंडळ मान्यता देण्यात आल्यानंतर शासन निर्णय कधी येईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना दिनांक 03 जानेवारी 2023 रोजी सलोखा योजनेचा शासन निर्णय (Salokha Yojana GR) जाहीर करण्यात आला आहे.

मित्रांनो, सलोखा योजना (Salokha Yojana Maharashtra) नेमकी काय आहे? ह्या योजनेच्या अटी व शर्ती काय आहेत? योजनेचे फायदे आणि नुकसान तसेच योजनेसंदर्भातील वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि योजनेच्या शासन निर्णयाविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या ह्या लेखात जाणून घेणार आहोत.

सलोखा योजना नेमकी काय आहे?

महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये जमिनीच्या वादाबाबतची कोट्यवधी प्रकरणे विविध न्यायालयांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. त्यामध्ये मुख्यतः मालकी हक्काबाबतचे वाद, शेत बांधावरुन होणारे वाद, जमिनीच्या ताब्याबाबतचे वाद, रस्त्याचे वाद, शेत जमीन मोजणीवरुन होणारे वाद, अधिकार अभिलेखातील चुकीच्या नोंदीमुळे होणारे वाद, शेतीवरील अतिक्रमणावरुन होणारे वाद, शेती वहीवाटीचे वाद, “भावा- भावांतील वाटणीचे वाद, शासकिय योजेनेतील त्रुटी किंवा प्रस्ताव अमान्यतेबाबतचे वाद इत्यादी कारणांमुळे शेतजमीनीचे वाद समाजामध्ये आहेत. Salokha Yojana Maharashtra

सलोखा योजनेच्या अटी व शर्ती काय आहेत? जाणून घेण्यासाठी

येथे क्लिक करा

शेतजमिनीचे वाद हे अत्यंत क्लिष्ट स्वरूपाचे व गुंतागुंतीचे असल्याने न्यायालयातील व प्रशासनातील पुरेशा यंत्रणेअभावी सदर वाद वर्षानुवर्षे चालू आहेत. शेतजमिन हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा व संवेदनशिल विषय असल्यामुळे त्यातील वादांमुळे कौटुंबिक नात्यांमध्ये एकमेकांबद्दल असंतोषाची भावना व दुरावा निर्माण झाला आहे. सदर वादांमुळे अनेक पिढ्यांचे नुकसान झाले असून, आजच्या पिढीचाही खर्च व वेळेचा अपव्यय होत असून अशा प्रकारचे वाद संपुष्ठात येण्यामध्ये म्हणावी अशी प्रगती झालेली दिसत नाही.

सलोखा योजनेसंदर्भातील महत्त्वाचे प्रश्नोत्तरे जाणून घेण्यासाठी

येथे क्लिक करा

 

सदर वाद संपुष्ठात येवून समाजामध्ये सलोखा निर्माण व्हावा व एकमेकांतील सौख्य, शांतता व सौहार्द वाढीस लागावे यासाठी शासनाने अशा एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमिन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी नोंदणी फी व मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्याची “सलोखा योजना” {Salokha Yojana Maharashtra} राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. म्हणून खालीलप्रमाणे शासन निर्णय घेण्यात आला आहे.

सलोखा योजना शासन निर्णय (Salokha Yojana Maharashtra GR)

शेतजमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांतील आपआपसांतील वाद मिटविण्यासाठी व समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य व सौहार्द वाढीस लागण्यासाठी एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमिन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी मुद्रांक शुल्क नाममात्र रु.१०००/- व नोंदणी फी नाममात्र रु.१०००/- आकारण्याबाबत सवलत देण्याची “सलोखा योजना” राबविण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी

येथे क्लिक करा

तर मित्रांनो, अशाप्रकारे आजच्या ह्या अत्यंत महत्त्वपूर्ण लेखात आपण आज राज्य शासनाने महसूल विभागामार्फत राबविण्यात येणारी “सलोखा योजना” {Salokha Yojana Maharashtra} संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. ही अत्यंत उपयुक्त अशी माहिती आहे, त्यामुळे ही पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा.

अशाच उपयुक्त माहितीसाठी आमच्या www.batamikamachi.com या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.

१२ जिल्ह्यांसाठी २२२ कोटी, पहा तुमचं जिल्हा आहे का? येथे क्लिक करून पहा

 

तुम्ही आमच्या Whatsapp ग्रुप ला देखील जॉइन होऊ शकता.
Whatsapp ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी 👉👉 येथे क्लिक करा

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top