Salokha Yojana Terms and Conditions

सलोखा योजनेच्या अटी व शर्ती जाणून घ्या | Salokha Yojana Terms and Conditions

Salokha Yojana Terms and Conditions: मित्रांनो, राज्य शासनाने आणलेली सलोखा योजना (Salokha Yojana) सुरू झालेली आहे. सलोखा योजनेचा शासन निर्णय दि. ०३ जानेवारी २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

तर मित्रांनो सलोखा योजनेच्या अटी व शर्ती (Salokha Yojana Terms and Conditions) काय आहेत? हे आपण ह्या लेखात पाहणार आहोत.

तसेच ह्या सलोखा योजनेमुळे शासन, शेतकरी व समाजाचे होणारे फायदे व तोटे-नुकसान देखील तुम्ही ह्या ठिकाणी जाणून घेऊ शकता.

Salokha Yojana Terms and Conditions

सलोखा योजनेच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत. (Salokha Yojana Terms and Conditions)

  • १. सलोखा योजनेचा कालावधी अदलाबदल दस्तासाठी नोंदणी फी व मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्याबाबतची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून दोन वर्षांचा राहील.
  • २. सदर योजनेत पहिल्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे किमान १२ वर्षापासून असला पाहिजे.
  • ३. एकाच गावात जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांचे परस्परांकडे मालकी व ताबा असलेबाबतचा वस्तुस्थितीदर्शक पंचनामा मंडळ अधिकारी व तलाठी यांनी विहित पंचनामा नोंदवहीमध्ये केला पाहिजे व सदर पंचनामा नोंदवहीवरून तलाठी यांनी जावक क्रमांकासह पंचनामा प्रमाणपत्र शेतकऱ्यांना दिले पाहिजे. अदलाबदल दस्त नोंदणीवेळी पक्षकारांनी सदर पंचनामा दस्तास जोडला पाहिजे.
  • ४. सलोखा योजनेंतर्गत दस्तामध्ये अधिकार अभिलेखातील सर्वसमावेशक शेरे, क्षेत्र, भोगवटादार वर्ग / सत्ताप्रकार, पुनर्वसन / आदिवासी/ कूळ इ. सर्व बाबी विचारात घेऊन दोन्ही पक्षकारांनी सर्वसंमतीने हा अदलाबदल दस्त नोंदवित आहे, अशा प्रकारची अट दस्तामध्ये समाविष्ठ करणे आवश्यक आहे. Salokha Yojana Terms and Conditions

सलोखा योजनेसंदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर येथे क्लिक करून त्याची उत्तरे जाणून घ्या

 

  • ५. पहिल्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे या व्यतिरिक्त इतर वैयक्तीक जमिनींचे अदलाबदल करण्याबाबतच्या प्रकरणांचा सलोखा योजनेत समावेश असणार नाही किंवा अशी प्रकरणे मुद्रांक शुल्क व नोंदणी फी सवलतीस पात्र असणार नाही.
  • ६. सदर योजनेमध्ये पहिल्याचा ताबा दुसऱ्याकडे व दुसऱ्याचा ताबा पहिल्याकडे असणाऱ्या जमिनीच्या दोन्ही बाजूकडील क्षेत्रामध्ये कितीही फरक असला तरी ते या योजनेसाठी पात्र ठरतील.
  • ७. अकृषिक, रहिवासी तसेच वाणिज्यिक वापराच्या जमिनीस सदर योजना लागू असणार नाही.
  • ८. योजना अंमलात येण्यापुर्वी काही पक्षकारांनी जमिनीची अदला-बदल केली असेल किंवा अदलाबदल दस्तासाठी अगोदरच मुद्रांक शुल्क व नोंदणी फी भरली असेल तर त्याचा परतावा मिळणार नाही.
  • ९. सदर योजनेमध्ये दोन्ही पक्षकारांची जमीन ही यापूर्वीच तुकडा घोषित असेल तर त्याबाबत प्रमाणित गटबुकाची प्रत दस्तास जोडून अदलाबदल दस्त नोंदवून त्याप्रमाणे दस्ताचे वस्तुस्थितीनुसार फेरफाराने नावे नोंदविता येतील.

सलोखा योजनेचे फायदे आणि तोटे – नुकसान काय आहेत? जाणून घेण्यासाठी

येथे क्लिक करा

 

तर मित्रांनो, अशाप्रकारे आपण ह्या लेखात सलोखा योजनेच्या अटी व शर्ती तसेच सदर योजनेचे फायदे आणि तोटे-नुकसान काय आहेत? हे जाणून घेतले आहे. ही माहिती शेतकरी बांधवांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ही पोस्ट शेअर नक्की करा. अशाच उपयुक्त माहितीसाठी आमच्या www.batamikamachi.com ह्या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top