कोणतीही तक्रार किंवा समस्या असेल, तर आता सोडवा समाधान शिबीरात | Samadhan Shibir

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Samadhan Shibir:- प्रशासन लोकाभिमुख व गतीमान होवून नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी वेळ,श्रम आणि पैशाची बचत व्हावी आणि नागरिकांच्या समस्या सोडविल्या जाव्यात, महणून प्रशासनाकडून आता समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वाशिम जिल्ह्यात हे शिबीर यशस्वी व्हावे, म्हणून शासनाकडून जनजागृती सुद्धा करण्यात येत असून, सदर समाधान शिबीराचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी षन्मुगराजन यांचे आवाहन

समाधान शिबीरासाठी जिल्हयातील नागरीकांच्या तसेच लाभार्थ्यांच्या कोणत्याही शासकीय विभागाकडे सार्वजनिक विकासासंदर्भात मागणी व वैयक्तीक अर्ज हे संबंधित तहसिल कार्यालयात स्विकारले जाणार आहे. जास्तीत जास्त समस्याची सोडवणूक करण्यासाठी नागरीकांनी समाधान शिबीराचा (Samadhan Shibir) लाभ घ्यावा, असे आवाहन वाशिम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी केले आहे.

काल 7 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात 22 जानेवारी व 5 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित समाधान शिबीराच्या अनुषंगाने आयोजित सभेत श्री. षन्मुगराजन बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिेगे,  उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन चव्हाण, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले, वीज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता मंगेश वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. षन्मुगराजन म्हणाले, समाधान शिबीराबाबत जास्तीत जास्त जनजागृती करण्यात यावी. ग्रामीण भागात दवंडीच्या माध्यमातून लोकांना माहिती द्यावी. तहसिल कार्यालयातील स्वतंत्र कक्षात अर्जदारांकडून प्राप्त होणारे अर्ज दोन प्रतीत घ्यावे. अर्ज मिळाल्याची पोच देवून टोकन द्यावे. यासाठी स्वतंत्र रजिस्टरमध्ये नोंद घ्यावी. तहसिल कार्यालयातील स्वतंत्र कक्षात येणारे अर्ज ज्या विभागाशी संबंधित आहे, त्या विभागाकडे त्वरीत कार्यवाहीसाठी पाठवावे. प्राप्त अर्ज त्वरीत निकाली काढण्यावर भर द्यावा. असे त्यांनी सांगितले.

अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रशासन लोकाभिमुख व गतीमान होवून नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी वेळ, श्रम आणि पैशाची बचत समाधान शिबीराच्या माध्यमातून होणार असल्याचे सांगून श्री.षन्मुगराजन म्हणाले, नागरीकांनी त्यांच्या अर्जाचे लेखी निवेदन, आपले नांव, पूर्ण पत्ता व मोबाईल नंबरसह दोन प्रतीत तहसिल कार्यालयातील स्वतंत्र कक्षात दोन प्रतीत सादर करुन टोकन प्राप्त करुन घ्यावे. अर्ज व निवेदन लेखी स्वरुपात 22 नोव्हेंबरपर्यंत संबंधित तहसिल कार्यालयाच्या स्वतंत्र कक्षात स्विकारले जातील. 22 जानेवारी 2023 रोजी वाशिम, मालेगांव व रिसोड तालुक्यासाठी आणि 5 फेब्रुवारी 2023 रोजी मंगरुळपीर, कारंजा व मानोरा तालुक्यासाठी जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे हे शिबीर आयोजित केले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

सभेला सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी, उपविभागीय अधिकारी व सर्व तहसिलदार उपस्थित होते.

तर मित्रांनो, तुमच्याही काही समस्या अथवा अडचणी असतील, तर या समाधान शिबिराचा तुम्ही अवश्य लाभ घ्या. आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा असाच प्रकारचे समाधान शिबीर आयोजित करण्यात आले आहे का याची माहिती तुमच्या तालुक्यातील तहसील कार्यालयात जाऊन अवश्य चौकशी करा.

सर्व योजनांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या www.batamikamachi.com वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.

*आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा: 👉👉 शेतकरी योजना ग्रुप

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top