Sarpanch Salary in Maharashtra: मित्रांनो, नुकतेच राज्यात जवळपास 7 हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीत सरपंचांची निवड ही थेट जनतेतून करण्यात आली आहे.
बर्याच ठिकाणी आता सरपंचांनी पदभार स्वीकारला आहे आणि उपसरपंच पदासाठी निवडणूक देखील पार पडली आहे.
मित्रांनो, ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पद थेट जनतेतून निवडले जात असल्याने गावागावात आता बरेच लोक सरपंच पदासाठी आपले नशीब आजमावत आहेत.
सरपंच पद मिळावे म्हणून लोकं आता पैसे खर्च करण्यासही मागे पुढे पाहत नाहीत, त्यामुळे आपल्यापैकी बर्याच जणांना प्रश्न पडलेला असेल की इतके पैसे खर्च करून हे निवडणूक लढवित असतील तर मग सरपंच बनल्यानंतर यांना नेमके किती पैसे मिळत असतील? सरपंचाला पगार किती असेल?
तर मित्रांनो, आजच्या ह्या लेखात आपण सरपंच आणि उपसरपंच (Sarpanch Salary in Maharashtra) यांना किती पगार मिळतो? हे जाणून घेऊयात.
Sarpanch Salary in Maharashtra
मित्रांनो, एकेकाळी सर्व ग्रामसभा, समित्यांचे अध्यक्षपद तसेच सरपंच यांची निवड ग्रामपंचायत सदस्यांमधून निवडणुकीने होत होती. आर्थिक वर्षाच्या पहिल्या ग्रामसभेचे अध्यक्षपद सरपंचांकडे आणि इतर ग्रामसभांचे अध्यक्षपद ग्रामसभा ठरवील त्यांना मिळत होते.
मात्र, जुलै 2017 पासून गावातील पात्र मतदारांकडून गुप्त मतदान पद्धतीने थेट सरपंचाची निवड होत आहे. सर्व ग्रामसभांचे आणि ग्रामविकास समित्यांचे पदसिद्ध अध्यक्षपद सरपंच यांच्याकडे असते.
सरपंचांचे अधिकार आता वाढले आहेत, त्यामुळे त्यांना नेमका पगार {Sarpanch Salary in Maharashtra} किती मिळतो? हे जाणून घेण्यास अनेक जन उत्सुक असतात.
सरपंच – उपसरपंच यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा शासन निर्णय
येथे क्लिक करून पहा
आधी फक्त सरपंचांना मिळायचे मानधन
मित्रांनो, महाराष्ट्राच्या सरपंचांच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भातील 30 जुलै 2019 च्या शासन निर्णयाआधी फक्त सरपंच यांना मानधन दिले जायचे. उपसरपंच यांना कोणतेही मानधन मिळत नव्हते.
अ) मित्रांनो, आधी 0 ते 2000 पर्यंत लोकसंख्येच्या ग्रामपंचायती असतील तर
- या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना मानधनाची दरमहा मिळणारी रक्कम – 1000/- एवढी होती
- या मानधनात शासनाकडून 75 टक्के मानधन देण्यात येते होते तर उर्वरित मानधन ग्रामपंचायत स्वनिधीमधून देण्यात यायचे.
ब) मित्रांनो, आधी 2001 ते 8000 पर्यंत लोकसंख्येच्या ग्रामपंचायती असतील तर
- या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना मानधनाची दरमहा मिळणारी रक्कम – 1500/- एवढी होती
- या मानधनात शासनाकडून 75 टक्के मानधन देण्यात येते होते तर उर्वरित मानधन ग्रामपंचायत स्वनिधीमधून देण्यात यायचे.
क) मित्रांनो, 8001 पेक्षा जास्त लोकसंख्येच्या ग्रामपंचायती असतील तर
- या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना मानधनाची दरमहा मिळणारी रक्कम – 2000/- एवढी होती
- या मानधनात शासनाकडून 75 टक्के मानधन देण्यात येते होते तर उर्वरित मानधन ग्रामपंचायत स्वनिधीमधून देण्यात यायचे.
सरपंचांच्या मानधनात वाढ, तर उपसरपंचांनाही मानधन सुरू
मित्रांनो, सन 2019-20 मध्ये महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री मा. अजीत पवार त्यांनी राज्याचा सन 2019-20 चा अर्थसंकल्प सादर करताना सरपंचांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली होती.
मा. अजीत पवार यांनी केलेल्या घोषनेच्या अनुषंगाने दिनांक 30 जुलै 2019 रोजी शासन निर्णय निर्गमित करून सरपंचांच्या मानधनात वाढ करण्यात आली तसेच उपसरपंच यांना देखील मानधन सुरू करण्यात आले.
आता तुमच्या गावातील सरपंच आणि उपसरपंच यांना किती पगार मिळतो? (Sarpanch Salary in Maharashtra) हे जाणून घेण्यासाठी खाली क्लिक करून पहा.