Sarpanch Salary in Maharashtra

Sarpanch Salary in Maharashtra 2024 : पहा तुमच्या गावच्या सरपंचाला मिळतो “इतका” पगार!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Sarpanch Salary in Maharashtra: सरपंच हा ग्रामपंचायतीचा प्रमुख असतो, ग्रामपंचायतीचा अध्यक्ष किंवा सभापती म्हणून तो काम पाहत असतो.

2017 आधी सरपंचांची निवड ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यातून केली जात असे, परंतू 3 जुलै 2017 रोजीच्या मंत्रिमंडळ निर्णयानंतर सरपंचांची निवड थेट जनतेतून केली जात आहे.

आता ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पद थेट जनतेतून निवडले जात असल्याने आणि सरपंचांना गावाचा ‘शक्तिमान नेता’ म्हणून ओळख मिळाल्याने गावागावात आता बरेच लोक सरपंच पदाच्या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत.

आपल्यालाच सरपंच पद मिळावे म्हणून गावातील इच्छुक पुढारी आता सर्व ताकद पणाला लावत आहेत. तसेच निवडून येण्यासाठी ते कितीही पैसे खर्च करण्यास मागे पुढे पाहत नाहीत.

त्यामुळे आपल्यापैकी बर्‍याच जणांच्या मनात हा प्रश्न पडलेला असेल की इतके पैसे खर्च करून हे सरपंच पदासाठी निवडणूक लढवित असतील तर मग सरपंच बनल्यानंतर यांना मानधन म्हणून नेमके किती पैसे मिळत असतील? सरपंचाला नेमका पगार किती असेल?

तर मित्रांनो, आजच्या ह्या अत्यंत माहितीपूर्ण अशा लेखात आपण सरपंच आणि उपसरपंच (Sarpanch Payment in Maharashtra) यांना नेमका किती पगार मिळतो? हे जाणून घेणार आहोत.

Sarpanch Salary in Maharashtra

एकेकाळी म्हणजेच जुलै 2017 पूर्वी सर्व ग्रामसभा, विविध समित्यांचे अध्यक्षपद तसेच सरपंच यांची निवड ग्रामपंचायत सदस्यांमधून निवडणुकीने होत होती.

आर्थिक वर्षाच्या पहिल्या ग्रामसभेचे अध्यक्षपद सरपंचांकडे आणि इतर ग्रामसभांचे अध्यक्षपद ग्रामसभा ठरवील त्यांना मिळत होते.

मात्र, 3 जुलै 2017 पासून आता गावातील पात्र मतदारांकडून गुप्त मतदान पद्धतीने थेट सरपंचाची निवड होत आहे.

सरपंचांचे अधिकार आता वाढले आहेत, त्यामुळे त्यांना नेमका पगार किती मिळतो? {Salary of Sarpanch in Maharashtra}  हे जाणून घेण्यास अनेक जन उत्सुक असतात.

आधी एवढा मिळायचा सरपंचांना पगार

महाराष्ट्राच्या सरपंचांच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भात आणि उपसरपंच यांना मानधन सुरू करण्याबाबत दिनांक 30 जुलै 2019 रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाद्वारे शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

मात्र या आधी सरपंचांना नेमके किती मानधन मिळायचे हे आपण आता पाहुयात.

Previous Sarpanch Salary Maharashtra

अ) आधी 0 ते 2000 पर्यंत लोकसंख्येच्या ग्रामपंचायती असतील तर

  • या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना मानधनाची दरमहा मिळणारी रक्कम – 1000/- एवढी होती.
  • या मानधनात शासनाकडून 75 टक्के मानधन देण्यात येते होते तर उर्वरित मानधन ग्रामपंचायत स्वनिधीमधून देण्यात यायचे.

ब) आधी 2001 ते 8000 पर्यंत लोकसंख्येच्या ग्रामपंचायती असतील तर

  • या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना मानधनाची दरमहा मिळणारी रक्कम – 1500/- एवढी होती.
  • या मानधनात शासनाकडून 75 टक्के मानधन देण्यात येते होते तर उर्वरित मानधन ग्रामपंचायत स्वनिधीमधून देण्यात यायचे.

क) 8001 पेक्षा जास्त लोकसंख्येच्या ग्रामपंचायती असतील तर

  • या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना मानधनाची दरमहा मिळणारी रक्कम – 2000/- एवढी होती.
  • या मानधनात शासनाकडून 75 टक्के मानधन देण्यात येते होते तर उर्वरित मानधन ग्रामपंचायत स्वनिधीमधून देण्यात यायचे.
sarpanch salary
Previous Salary of Sarpanch in Maharashtra

 

सरपंचांच्या मानधनात वाढ, तर उपसरपंचांनाही मानधन सुरू

दिनांक 30 जुलै 2019 रोजीच्या महाराष्ट्राच्या सरपंचांच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भात आणि उपसरपंच यांना मानधन सुरू करण्याबाबतच्या शासन निर्णयाआधी फक्त सरपंच यांना मानधन दिले जायचे. उपसरपंच यांना कोणतेही मानधन मिळत नव्हते.

सन 2019-20 मध्ये महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री मा. अजीत पवार त्यांनी राज्याचा सन 2019-20 चा अर्थसंकल्प सादर करताना सरपंचांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली होती. सोबतच उपसरपंचांनाही मानधन मिळणार असल्याची घोषणा केली होती.

मा. अजीत पवार यांनी केलेल्या घोषनेच्या अनुषंगाने दिनांक 30 जुलै 2019 रोजी शासन निर्णय निर्गमित करून सरपंचांच्या मानधनात वाढ करण्यात आली तसेच उपसरपंच यांना देखील मानधन सुरू करण्यात आले.

त्यामुळे आता तुमच्या गावातील सरपंच आणि उपसरपंच यांना किती पगार मिळतो? (Sarpanch Payment in Maharashtra) हे आता आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

Sarpanch Salary 2024

संबंधित ग्रामपंचायतच्या लोकसंख्येनुसार त्या गावातील सरपंच – उपसरपंच यांचे दरमहा मानधन (सरपंच पगार) निश्चित करण्यात आले आहे. तर शासन निर्णयानुसार सरपंच आणि उपसरपंच यांना किती मानधन मिळते? चला पाहुयात.

अ) 0 ते 2000 पर्यंत लोकसंख्येच्या ग्रामपंचायती असतील तर, 2019 च्या शासन निर्णयानुसार राज्यात 0 ते 2000 पर्यंत लोकसंख्येच्या एकूण 17392 ग्रामपंचायती आहेत.

  • या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना मानधनाची दरमहा मिळणारी रक्कम – 3000/-
  • या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांना मानधनाची दरमहा मिळणारी रक्कम – 1000/-

या मानधनात शासनाकडून 75 टक्के मानधन देण्यात येते तर उर्वरित मानधन ग्रामपंचायत स्वनिधीमधून देण्यात येतो.

ब) 2001 ते 8000 पर्यंत लोकसंख्येच्या ग्रामपंचायती असतील तर, 2019 च्या शासन निर्णयानुसार राज्यात 2001 ते 8000 पर्यंत लोकसंख्येच्या एकूण 9841 ग्रामपंचायती आहेत.

  • या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना मानधनाची दरमहा मिळणारी रक्कम – 4000/-
  • या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांना मानधनाची दरमहा मिळणारी रक्कम – 1500/-

या मानधनात शासनाकडून 75 टक्के मानधन देण्यात येते तर उर्वरित मानधन ग्रामपंचायत स्वनिधीमधून देण्यात येतो.

क) 8001 पेक्षा जास्त लोकसंख्येच्या ग्रामपंचायती असतील तर, 2019 च्या शासन निर्णयानुसार राज्यात 8001 पेक्षा जास्त लोकसंख्येच्या एकूण 621 ग्रामपंचायती आहेत.

  • या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना मानधनाची दरमहा मिळणारी रक्कम – 5000/-
  • या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांना मानधनाची दरमहा मिळणारी रक्कम – 2000/-

या मानधनात शासनाकडून 75 टक्के मानधन देण्यात येते तर उर्वरित मानधन ग्रामपंचायत स्वनिधीमधून देण्यात येतो.

📃 “सरपंच-उपसरपंच यांना मिळणारे मानधन” याबद्दलचा शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

salary of sarpanch in maharashtra
salary of sarpanch in maharashtra

तर मित्रांनो, अशाप्रकारे महाराष्ट्रात सरपंच आणि उपसरपंच यांना वरीलप्रमाणे मानधन दिले जाते. दिनांक 01 जुलै 2019 पासून ह्या तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत. दिनांक 30 जुलै 2019 रोजी  याबद्दलचा शासन निर्णय निर्गमित केला गेला आहे.

मित्रांनो, अतिशय उपयुक्त अशी माहिती आपण आज या लेखात जाणून घेतली आहे. अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीसाठी आमच्या https://batamikamachi.com/ ह्या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top