Sarpanch Upsarpanch Salary in Maharashtra

सरपंच – उपसरपंच यांना किती पगार मिळतो? | Sarpanch Upsarpanch Salary in Maharashtra

Sarpanch Upsarpanch Salary in Maharashtra: मित्रांनो, सन 2019-20 मध्ये महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री असताना तत्कालीन मा. वित्तमंत्री अजीत पवार यांनी राज्याचा सन 2019-20 चा अर्थसंकल्प सादर करताना सरपंचांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली होती. मा. अजीत पवार यांनी केलेल्या घोषनेच्या अनुषंगाने दिनांक 30 जुलै 2019 रोजी शासन निर्णय निर्गमित करून सरपंचांच्या मानधनात वाढ करण्यात आली तसेच उपसरपंच यांना आधी मानधन मिळत नव्हते, पण या शासन निर्णयाद्वारे उपसरपंच यांना देखील मानधन सुरू करण्यात आले.

Sarpanch Upsarpanch Salary in Maharashtra

मित्रांनो, संबंधित ग्रामपंचायतच्या लोकसंख्येनुसार त्या गावातील सरपंच – उपसरपंच यांचे दरमहा मानधन (Sarpanch Upsarpanch Salary in Maharashtra) निश्चित करण्यात आले आहे. तर शासन निर्णयानुसार सरपंच आणि उपसरपंच यांना किती मानधन मिळते? चला पाहुयात.

अंतिम मतदार यादी प्रसिद्ध, यादीत तुमचे नाव आहे का नाही?

येथे क्लिक करून चेक करा

अ) 0 ते 2000 पर्यंत लोकसंख्येच्या ग्रामपंचायती

मित्रांनो, 2019 च्या शासन निर्णयानुसार राज्यात 0 ते 2000 पर्यंत लोकसंख्येच्या एकूण 17392 ग्रामपंचायती आहेत.

  • या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना मानधनाची दरमहा मिळणारी रक्कम – 3000/-
  • या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांना मानधनाची दरमहा मिळणारी रक्कम – 1000/-
  • या मानधनात शासनाकडून 75 टक्के मानधन देण्यात येते तर उर्वरित मानधन ग्रामपंचायत स्वनिधीमधून देण्यात येतो.

ब) 2001 ते 8000 पर्यंत लोकसंख्येच्या ग्रामपंचायती

मित्रांनो, 2019 च्या शासन निर्णयानुसार राज्यात 2001 ते 8000 पर्यंत लोकसंख्येच्या एकूण 9841 ग्रामपंचायती आहेत.

  • या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना मानधनाची दरमहा मिळणारी रक्कम – 4000/-
  • या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांना मानधनाची दरमहा मिळणारी रक्कम – 1500/-
  • या मानधनात शासनाकडून 75 टक्के मानधन देण्यात येते तर उर्वरित मानधन ग्रामपंचायत स्वनिधीमधून देण्यात येतो.

क) 8001 पेक्षा जास्त लोकसंख्येच्या ग्रामपंचायती

मित्रांनो, 2019 च्या शासन निर्णयानुसार राज्यात 8001 पेक्षा जास्त लोकसंख्येच्या एकूण 621 ग्रामपंचायती आहेत.

  • या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना मानधनाची दरमहा मिळणारी रक्कम – 5000/-
  • या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांना मानधनाची दरमहा मिळणारी रक्कम – 2000/-
  • या मानधनात शासनाकडून 75 टक्के मानधन देण्यात येते तर उर्वरित मानधन ग्रामपंचायत स्वनिधीमधून देण्यात येतो.

सरपंच-उपसरपंच यांना देण्यात येणारे मानधन याबद्दलचा शासन निर्णय

तर मित्रांनो, अशाप्रकारे महाराष्ट्रात सरपंच आणि उपसरपंच यांना वरीलप्रमाणे मानधन दिले जाते. दिनांक 01 जुलै 2019 पासून ह्या तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत. दिनांक 30 जुलै 2019 रोजी  याबद्दलचा शासन निर्णय निर्गमित केला गेला आहे.

📃शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी 👉येथे क्लिक करा

मित्रांनो, अतिशय उपयुक्त अशी माहिती आपण आज जाणून घेतली आहे. अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीसाठी आमच्या http://www.batamikamachi.com ह्या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा. किंवा व्हाट्सअप ग्रुपला देखील जॉइन होऊ शकता.

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top