Satatcha Paus Anudan 2023

Satatcha Paus Anudan 2023 : “या” 14 जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सततच्या पावसाचे 1500 कोटी अनुदान मिळणार, पहा जिल्हानिहाय तपशील

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Satatcha Paus Anudan 2023 : मित्रांनो, राज्यातील 14 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी असून, गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बाधित शेतकऱ्यांना 1400 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय दिनांक 13 जून 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता.

👉👉 सततच्या पावसासाठी 1500 कोटी रुपये मंजूर, मंत्रिमंडळ निर्णय येथे क्लिक करून पहा 👈👈

अखेर आज दिनांक 20 जून 2023 रोजी सन 2022 च्या पावसाळी हंगामात अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकर्‍यांना विशेष बाब म्हणून 1500 कोटी रुपये मदत देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. “Satatcha Paus Anudan 2023″

Satatcha Paus Anudan 2023

सततचा पाऊस {Satatcha Paus Anudan 2023} ही राज्य शासनामार्फत नवीन आपत्ती घोषित करुन मदत देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या 5 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे शेतीपिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने व निकषानुसार मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे दर सुधारित केले आहेत. त्यानुसार जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रतिहेक्टर 8500 रुपये, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 17 हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 22500 रुपये प्रति हेक्टर अशी 2 हेक्टरच्या मर्यादेत ही मदत देण्यात येईल.

🌾🌾 खरीप हंगाम 2023-24 चे नवीन हमीभाव जाहीर 🌾🌾

👉👉 खरीप पिकांचे नवीन हमीभाव येथे क्लिक करून पहा 👈👈

शासन निर्णय

सन 2022 च्या पावसाळी हंगामातील अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रलंबित निधी मागणीच्या प्रस्तावामधील बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता, शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने व निकषानुसार एकूण रु. 150000.00 लक्ष (अक्षरी रुपये पंधराशे कोटी फक्त) इतका निधी सोबतच्या प्रपत्रात दर्शविल्यानुसार जिल्हानिहाय वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.

👉👉 कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकर्‍यांना किती मदत मंजूर, येथे क्लिक करून पहा 👈👈

सततच्या पावसाचे अनुदान जिल्हानिहाय तपशील

 

जिल्हाशेतकरी संख्याबाधित क्षेत्रवितरीत निधी
अहमदनगर292751   190470.3324101.43
अकोला13365691845.998672.70
अमरावती203121127596.0212957.36
छ.संभाजीनगर

(औरंगाबाद)

401446253239.8522698.11
बीड437688224023.3019503.27
बुलढाणा268323135175.6011490.29
जळगाव6285927537.004514.73
जालना214793147340.2313422.28
नागपूर61614832.81623.23
नाशिक11274326027.282583.36
धाराशिव (उस्मानाबाद)216013159387.3713707.58
परभणी18851382792.027037.32
सोलापूर4916840674.864689.85
वाशिम6371647029.303998.49
एकूण26509511557971.96150000.00

 

तर शेतकरी मित्रांनो, वरीलप्रमाणे जिल्हानिहाय शेतकरी संख्या आणि त्यांच्यासाठी वितरीत करण्यात आलेला निधी याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या ह्या लेखात जाणून घेतली आहे. याबद्दलचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी 👉👉 येथे क्लिक करा

 

अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा GR आला, पहा अशी असेल योजनेची पात्रता आणि कार्यपद्धती

______________________________

  • अशाच प्रकारच्या शेतीविषयक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा. 👉👉 batamikamachi.com
  • शेतीविषयक माहिती आणि अपडेट्स तुमच्या व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉइन करा. 👉👉 Whatsapp Group

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top