Shetipurak Vyavsay:- मित्रांनो, आपला भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि शेती आपला प्रमुख व्यवसाय आहे; परंतु शेती आता फायद्याची राहिली नाही असे म्हणत दिवसेंदिवस अनेक जण शेतीला सोडचिठ्ठी देऊ पाहत आहे. केवळ शारीरिक कष्ट नको म्हणून आज ग्रामीण भागातील तरुण शहराकडे धाव घेत आहेत. त्यातही कधी अस्मानी संकटे तर कधी सुलतानी संकटे, यामुळेही अनेक शेतकऱ्यांना शेती ही तोट्याची वाटायला लागली आहे. म्हणूनच आज गरज आहे शेतीबरोबरच कृषीपूरक व्यवसायाची (Shetipurak Vyavsay). शेतीसोबतच असे काही व्यवसाय सुरू करण्याची जे शेतीला पूरक ठरतील.
शेतीपूरक व्यवसाय (Shetipurak Vyavsay)
तर शेतकरी मित्रांनो, आजच्या ह्या लेखात मी तुम्हाला ५ अशा कृषीपूरक व्यवसायाबद्दल माहिती देणार आहे, जे तुम्ही शेती करता करताही करू शकता, असे शेतीपूरक व्यवसाय {shetipurak vyavsay) जे तुम्ही शेतीला जोडधंदा म्हणून करू शकता.
मित्रांनो, तुमच्याकडे थोडीशी जमीन जरी असेल तरी हे कृषीपूरक व्यवसाय (krushipurak vyavsay) तुम्हाला आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतात. शेतीला एखाद्या व्यवसायाची जोड दिल्यास नक्कीच शेती फायदेशीर ठरेल यात शंका नाही.
तर शेतकरी मित्रांनो, ह्या लेखामध्ये मी तुम्हाला ५ अशा कृषिपूरक व्यवसायांबद्दल माहिती देणार आहे, जे तुमच्याकडे एकरभर जमीन जरी असली, तरी तुम्हाला चांगला पैसा मिळवून देऊ शकतात. जे शेती करता करताही तुम्ही करू शकता आणि चांगले उत्पन्न मिळवू शकता.
१) शेळीपालन (Shelipalan) {Goat Farming}
तर पहिला शेतीपूरक व्यवसाय आहे, शेळीपालनाचा.
मित्रांनो, शेळी ही गरीबांची गाय म्हणून ओळखली जाते. कमी पैसा आणि कमी जागेत व्यवस्थित उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय म्हणजे शेळीपालन (shelipalan). शेळीपालनाला खर्च हा फार कमी लागत असतो आणि चांगला मोठा नफा यातून मिळत असतो. shetipurak vyavsay
पण ह्यासाठी व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक असते. दिवसेंदिवस शेळीपालन हा व्यवसाय शेतीला फायदेशीर असा पूरक व्यवसाय म्हणून नावारूपास येत आहे. शेळीपालन व्यवसायास बरेच महत्त्व येत असून तो एक स्वंतत्र व्यवसाय झाला आहे. हा व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे.
शेळयांना इतर जनावरांपेक्षा जसे की गाई, म्हैस यांपेक्षा खूप कमी प्रमाणात खाद्य लागते. साधारणत: एका गाईला लागणार्या खाद्यामध्ये १० शेळ्या जगू शकतात. त्यामुळे कमी जमीन असणार्या शेतकर्यांसाठी हा व्यवसाय अतिशय फायदेशीर आहे. खाद्याचे, शेळयांच्या आरोग्याचे, निवार्याचे व पिण्यासाठी लागणार्या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास हा व्यवसाय अतिशय फायदेशीर ठरतो. त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय (Shetipurak Vyavsay) म्हणून शेळीपालन अगदी बेस्ट ऑप्शन ठरते.
२) दुग्ध व्यवसाय (Dugdh Vyavsay) {Dairy Farming}
मित्रांनो, त्यांनतर दुसरा कृषीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय (Dugdh Vyavsay) हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला व्यवसाय तुम्ही करू शकता.
दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई, देशी गाई, गावठी दुधाळ गाई आणि दुधाळ म्हशी पाळल्या जातात. पारंपारिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाने व्यावसायिकदृष्ट्या हा व्यवसाय केला तर निश्चितपणे हा शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो व त्यात चांगली मिळकत होते.
मित्रांनो, दुधाच्या व्यवसायासाठी कोणत्याही विशेष प्रशिक्षणाची आवश्यकता नाही. हा व्यवसाय वर्षभर चालू राहील. येथे मजबूत कमाई आहे. सुरुवातीला तुम्ही १ ते २ प्राण्यांसह व्यवसाय सुरू करू शकता.
आणि जर आर्थिक बाजू चांगली असल्यावर तुम्हाला कृषिपूरक व्यवसाय (krushipurak vyavsay) म्हणून दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर तुमच्याकडे कमीत कमी १ ते २ एकर जमीन असणे आवश्यक आहे आणि तुम्ही ५ ते १० दुभत्या गाई-म्हशी घेऊन हा व्यवसाय सुरू करू शकता.
दुग्ध व्यवसायात यशस्वी होण्याकरिता दुधाळ जनावरांची निवड करणे, गोठ्याची स्वच्छता, पिण्याचे शुद्ध पाणी, चार्याची उपलब्धता आणि जनावरांचा आहार आणि त्यांचे आरोग्य इत्यादी बाबींवर लक्ष द्यावे लागते.
मित्रांनो, दूध जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोडल्या जात असल्याने, दुग्धव्यवसाय बंद राहू शकत नाही, त्यातही जनावरांपासून मिळणारे शेणखत शेताला उपयोगी पडते. त्यामुळे शेती सोबतच दुग्धव्यवसाय नियोजनपूर्वक केल्यास चांगले उत्पन्न मिळवता येते.
हरभरा पिकाचे टॉप १० सुधारीत वाण, येथे क्लिक करा
३) फुल शेती (Ful Sheti) {Flower Farming}
त्यानंतर तिसरा कृषिपूरक व्यवसाय म्हणून फुलशेती (Flower Farming) हा चांगला पर्याय आहे.
मित्रांनो, भारतासारख्या विविधता असलेल्या देशात, धार्मिक परंपरांमध्ये फुलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मंदिरांबाहेर होणारी फुलांच्या हाराची विक्री, विविध सण, समारंभात फुलांच्या गुच्छापासून सजावटीपर्यंत त्याचा होणारा वापर या गोष्टींमुळे फुलांना नेहमीच मागणी असते. चांगल्या-वाईट अशा कोणत्याही कार्यक्रमात फुले हमखास लागतातच.
दररोजच्या मार्केटमधील वाढती मागणी पाहता फुलशेती हा सर्वात चांगला नफा देणारा व्यवसाय ठरू शकतो. म्हणूनच आज व्यावसायिक दृष्ट्या फुलशेती ला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. नेट् शेड आणि पॉलीहाऊसचा वापर करुन आधुनिक तंत्रज्ञानाधिरत फुलशेती केली जाते. मिल्चिंग पेपरवर बेड तयार करून विशिष्ट अंतरावर लागवड केली जाते.
पॉलीहाऊसमध्ये अवघ्या २० गुंठ्यामध्ये वार्षिक ३ लाखांपर्यंत उत्पन्न घेता येते. याखेरीज केवळ फुलं विकण्याऐवजी फुलांपासून जी विविध उत्पादनं तयार केली जाऊ शकतात, त्यांच्यातूनही शेतक-याला चांगलं उत्पन्न मिळू शकतं. shetipurak vyavsay
४) भाजीपाला शेती आणि विक्री (Bhajipala Sheti) {Vegatabale Farming}
मित्रांनो, त्यानंतर चौथा कृषिपूरक व्यवसाय म्हणजे भाजीपाला शेती आणि भाजीपाला विक्री. (Bhajipala Sheti)
मित्रांनो, कमी वेळात आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय म्हणजे भाजीपाला शेती.
त्यातही स्वत:च भाजीपाला लागवड करून भाजीविक्री केली की तुम्ही खूप चांगला नफा यामधून कमावू शकता.
मित्रांनो, भाजीपाला शेती खूप कमी खर्चात होते; मात्र मेहनत करण्याची आपली तयारी हवी. शिवाय स्वत: भाजीपाला शेती केली की भाजीसाठी कधी पिशवी घेऊन बाजारात जावे लागत नाही व आपल्याच कुटुंबाला यामुळे सकस आहार मिळतो.
मित्रांनो, भाजीपाल्याशिवाय आपलं जेवनच बनत नाही, इतकं ते जीवनावश्यक आहे. त्यामुळे साहजिकच भाजीपल्याची मागणी नेहमीच असते, त्यामुळे भाजीपाला शेती करून भाजीपाला विक्री हा व्यवसाय नक्कीच नफा मिळवून देणारा कृषिपूरक व्यवसाय ठरू शकतो आणि भाजीपाला जीवनावश्यक असल्याने कधीही बंद न होणारा व्यवसाय आहे. त्यामुळे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून भाजीपाला शेती किंवा भाजीपाला विक्री व्यवसाय चांगले उत्पन्न मिळवू शकतो.
५) मधुमक्षिका पालन (Madhmashi Palan) {Honey Bee Farming}
त्यानंतर पाचवा कृषिपूरक व्यवसाय तुम्ही करू शकता मधुमक्षिका पालनाचा (Madhmashi Palan).
मित्रांनो, नैसर्गिक मध मिळवण्यासाठी मधमाश्या पाळणे यालाच म्हणतात मधमाशीपालन.
आपण मार्केटमधून मध खरेदी करतो पण ते शुद्ध असेलच याची खात्री देता येत नाही. बरेच लोक त्यात गूळ किंवा साखरेचा पाक मिसळतात. कधी कधी आपल्याला मधाची तातडीची गरज पडते पण ते आपल्याकडे उपलब्ध नसते. आपल्या मनात असाही प्रश्न येतो की मध बनते कसे?
मार्केटमध्ये मधाला प्रचंड मागणी आहे परंतु त्याचा पुरवठा कमी आहे. शेतकरी बांधवांसाठी हे क्षेत्र इतके उपयुक्त आहे की यात अजिबात स्पर्धा नाही. मधुमक्षिकापालनमधून आणखी एक दुय्यम उत्पादन मिळते, ज्याची मार्केटमध्ये खूप मागणी आहे आणि ते म्हणजे मेण, ज्यापासून मेणबत्ती तयार करतात. म्हणजे व्यवसाय एक आहे पण त्याचे फायदे अनेक आहेत. शेतकर्यांना कृषिपूरक व्यवसाय म्हणून ही मधमाशीपालन एक सुवर्णसंधी आहे, यामध्ये कमी गुंतवणूक करून व कमी कालावधीत भरपूर उत्पन्न कमवू शकतात.
मधुमक्षिका पालनासाठी मधमाशी बरोबर पेटीची आवश्यकता असते. एका पेटीची किंमत ही सुमारे ३५०० असते. या पेटीत एकूण दहा फ्रेम असतात. एका फ्रेम मधून साधारण २०० ग्रॅम एवढा मध मिळते म्हणजे एका पेटीतून २ किलो मध आपल्याला प्राप्त होत असते. एका पेटीतून आपण महिन्याला ४ किलो मध काढू शकतो. हे मध आपणाला जनरल सटोअर्स आणि किराणा स्टोअर मध्ये विकता येते. तसेच मध उत्पादन करणाऱ्या कपन्यांशी संलग्न राहून आपण त्यांनाही मध विकू शकतो. याला सरासरी १०० रुपये किलो इतका भाव मिळतो. अशा प्रकारे आपण शेतीसोबतच मधुमक्षिका पालन Madhmashi Palan हा कृषिपूरक व्यवसाय करू शकतो.
मित्रांनो, शेतकर्यांना निसर्गाशी सतत झगडावे लागत असल्यामुळे सातत्याने प्रतिकूल परिस्थितीला आणि आर्थिक अनिश्चिततेला तोंड द्यावे लागते. पैशाच्या अडचणी, कर्ज, व्याज, लाचारी व गरीबी या चक्रातच तो सातत्याने सापडतो. जर शेतकर्याने शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसाय {Shetipurak Vyavsay} केला तर तो सर्व अडचणींवर मात करू शकतो आणि चांगले जीवन जगू शकतो. म्हणूनच आजच्या ह्या लेखामध्ये आपण शेतकर्यांसाठी फायदेशीर असलेले ५ कृषिपूरक व्यवसायांची थोडक्यात माहिती घेतली आहे,
तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा.
हा लेख आवडल्यास आपल्या शेतकरी बांधवांशी नक्की शेयर करा.
आणी जर तुम्ही आपल्या वेबसाईटवर पहिल्यांदा आला असाल, तर अशाच शेतीविषयक उपयुक्त माहितीसाठी आमच्या http://www.batamikamachi.com या वेबसाईटला नेहमी भेट द्यायला विसरू नका. जेणेकरून यापुढेही येणारे असेच माहितीपूर्ण लेख तुम्ही वाचू शकाल.
तर आजच्या लेखामध्ये एवढंच, भेटूयात पुढच्या लेखामध्ये एका नवीन माहितीसोबत. धन्यवाद!