Unhali-Bhuimug-Lagwad-Variety

उन्हाळी भुईमुग लागवडीसाठी सुधारीत वाण | Unhali Bhuimug Top Variety

Unhali Bhuimug Top Variety: भुईमुगाच्या प्रामुख्याने पसऱ्या, निमपसऱ्या तसेच उपट्या अशा तीन जाती आहेत. महाराष्ट्रात प्रामुख्याने उपट्या प्रकारच्या जातींची लागवड केली जाते. उन्हाळी भुईमुग लागवडीसाठी सुधारीत वाणांची (Unhali Bhuimug Top Variety) लागवड करत असताना, रोपावस्थेत उद्भवणार्‍या रोगांपासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.

Unhali Bhuimug Top Variety

शेतकरी मित्रांनो, उन्हाळी भुईमुग लागवडीसाठी टॉप सुधारीत वाण {Unhali Bhuimug Top Variety} पुढीलप्रमाणे आहेत.

१) एस.बी. – ११

  • वाण – एस.बी. – ११
  • प्रसारीत वर्ष – १९६५
  • प्रकार – उपट्या
  • जमीन – मध्यम ते हलकी
  • हंगाम – खरीप आणि उन्हाळी
  • पेरणी/लागवडीचा कालावधी – १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी
  • प्रती एकर बियाणे – ४० ते ५० किलो
  • पीक परिपक्वतेचा कालावधी – १०५ ते ११० दिवस
  • सरासरी उत्पादन – उन्हाळी हंगामात २० ते २५ क्विं/हे
  • वैशिष्ट्ये – कोरडवाहुसाठी उत्तम, सर्व भागात वापर, जास्त दाण्याचे प्रमाण
  • शिफारशीत जिल्हे – संपूर्ण महाराष्ट्र

या जिल्हयांची खरीप हंगाम अंतिम पैसेवारी जाहीर, येथे क्लिक करून पहा तुमच्या जिल्ह्याची अंतिम पैसेवारी

२) टीएजी – २४

  • वाण – टीएजी – २४
  • प्रसारीत वर्ष – १९९१
  • प्रकार – उपट्या
  • हंगाम – खरीप आणि उन्हाळी
  • पेरणी/लागवडीचा कालावधी – १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी
  • पीक परिपक्वतेचा कालावधी – ११० ते ११५ दिवस
  • सरासरी उत्पादन – उन्हाळी हंगामात ३० ते ३५ क्विं/हे
  • शिफारशीत जिल्हे – संपूर्ण महाराष्ट्र

अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

३) जे.एल. – २८६ (फुले उनप)

  • वाण – जे.एल. – २८६ (फुले उनप)
  • प्रसारीत वर्ष – २००४
  • प्रकार – उपट्या
  • जमीन – मध्यम ते हलकी
  • हंगाम – खरीप आणि उन्हाळी
  • पेरणी/लागवडीचा कालावधी – १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी
  • प्रती एकर बियाणे – ४८ ते ५० किलो
  • पीक परिपक्वतेचा कालावधी – ९३ ते ९५ दिवस
  • सरासरी उत्पादन – उन्हाळी हंगामात २२ ते २५ क्विं/हे
  • वैशिष्ट्ये – मुळकुजव्या रोगास प्रतिकारक्षम, फुले येणारा कालावधी जास्त, तेलाचे प्रमाण ४९ ते ५०%
  • शिफारशीत जिल्हे – पश्चिम महाराष्ट्र, जळगाव आणि धुळे

४) वाण – टिपीजी – ४१ 

  • वाण – टिपीजी – ४१
  • प्रसारीत वर्ष – २००४
  • प्रकार – उपट्या
  • जमीन – मध्यम ते हलकी
  • हंगाम – उन्हाळी हंगामासाठी पश्चिम महाराष्ट्राकरिता प्रसारीत
  • पेरणी/लागवडीचा कालावधी – १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी
  • प्रती एकर बियाणे – ४८ ते ५० किलो
  • पीक परिपक्वतेचा कालावधी – १३० दिवस
  • सरासरी उत्पादन – उन्हाळी हंगामात ३० क्विं/हे
  • वैशिष्ट्ये – वाळलेल्या शेंगाचे अधिक उत्पादन, टपोरे शेंगदाणे इत्यादी
  • शिफारशीत जिल्हे – संपूर्ण महाराष्ट्र

५) वाण – जे.एल. – ५०१

  • वाण – जे.एल. – ५०१
  • प्रसारीत वर्ष – २००९
  • प्रकार – उपट्या
  • जमीन – मध्यम ते हलकी
  • हंगाम – खरीप आणि उन्हाळी
  • पेरणी/लागवडीचा कालावधी – १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी
  • प्रती एकर बियाणे – ४० ते ५० किलो
  • पीक परिपक्वतेचा कालावधी – १०५ ते ११० दिवस
  • सरासरी उत्पादन – उन्हाळी हंगामात ३० ते ३२ क्विं/हे
  • वैशिष्ट्ये – तेलाचे प्रमाण ४९%, दाणे खवट होण्यास प्रतिकारक्षम
  • शिफारशीत जिल्हे – संपूर्ण महाराष्ट्र

*आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा: 👉👉 शेतकरी योजना ग्रुप

६) वाण – फुले उन्नती (आर एच आर जी ६०८३)

  • वाण – फुले उन्नती (आर एच आर जी ६०८३)
  • प्रसारीत वर्ष – २०१२
  • प्रकार – उपट्या
  • जमीन – मध्यम ते हलकी
  • हंगाम – खरीप आणि उन्हाळी
  • पेरणी/लागवडीचा कालावधी – १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी
  • प्रती एकर बियाणे – ४८ ते ५० किलोपीक परिपक्वतेचा कालावधी – १२८ दिवस
  • सरासरी उत्पादन – उन्हाळी हंगामात ३५ ते ४० क्विं/हे
  • वैशिष्ट्ये – ऊंची ४५ ते ४० सेंमी, फुले नारंगी रंगाचे, तेलाचे प्रमाण ५२ टक्के, स्पोडोपटेरा, तांबेरा, टिक्का व खोडकुज रोगास प्रतिकारक क्षमता
  • शिफारशीत जिल्हे – संपूर्ण महाराष्ट्र

७) वाण – फुले ६०२१ (आर एच आर जी ६०२१)

  • वाण – फुले ६०२१ (आर एच आर जी ६०२१)
  • प्रसारीत वर्ष – २०११
  • प्रकार – उपट्या
  • जमीन – मध्यम ते हलकी
  • हंगाम – खरीप आणि उन्हाळी
  • पेरणी/लागवडीचा कालावधी – १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी
  • प्रती एकर बियाणे – ४८ ते ५० किलो
  • पीक परिपक्वतेचा कालावधी – १२० ते १२५ दिवस
  • सरासरी उत्पादन – उन्हाळी हंगामात ३५ ते ४० क्विं/हे
  • वैशिष्ट्ये – ऊंची २० ते २५ सेंमी, फुले नारंगी रंगाचे, तेलाचे प्रमाण ५१ टक्के, स्पोडोपटेरा, तांबेरा, टिक्का व खोडकुज रोगास प्रतिकारक क्षमता
  • शिफारशीत जिल्हे – पश्चिम महाराष्ट्र

तर मित्रांनो, हे आहेत उन्हाळी भुईमुग लागवडीसाठी सुधारीत वाण, रोपावस्थेत उद्भवणार्‍या रोगांपासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.

मित्रांनो, अशाप्रकारे आजच्या ह्या लेखात आपण उन्हाळी भुईमुग लागवडीसाठी सुधारीत वाणांची सविस्तर माहिती जाणून घेतली आहे, अशाच प्रकारच्या शेतीविषयक माहितीसाठी आमच्या www.batamikamachi.com वेबसाईटला नेहमी भेट देत राहा, जेणेकरून असेच शेतीविषयक माहितीपूर्ण लेख तुम्ही वाचू शकाल.

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top